नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 12:58 IST
1 / 10नेपाळमध्ये युवकांच्या जोरदार आंदोलनानंतर तिथे सत्तांतर घडले, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानं सरकार कोसळले आणि सुशीला कार्की यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार नेपाळमध्ये कार्यरत झाले. आता आणखी एका देशात असा उद्रेक पाहायला मिळत आहे. 2 / 10प्रशांत महासागर भागात असलेल्या फिलीपींस येथे आंदोलन करण्यासाठी शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनकर्त्यांना मी दोषी मानत नाही. एका प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचारामुळे लोकांमध्ये असंतोष वाढला आहे असं तिथले राष्ट्रपती मार्कोस यांनी म्हटलं. 3 / 10पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे फिलीपींसची राजधानी मनीला येथे अलीकडे जन आंदोलन सुरू झाले आहे. यूनिवर्सिटी ऑफ फिलीपींस परिसरात झालेल्या या विरोध आंदोलनात ३ हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. 4 / 10फिलीपींस देश भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या देशात जर राजकीय अस्थिरता वाढली तर त्याचा थेट परिणाम हिंद प्रशांत क्षेत्राच्या सुरक्षेवर पडणार आहे. फिलीपींसला सातत्याने चीन धमकी देत राहतो. त्यामुळे त्यांनी भारताकडून ब्रह्मोस मिसाईल खरेदी केल्या आहेत. 5 / 10फिलीपींसमध्ये आतापर्यंत झालेल्या आंदोलनात लोक इतके सहभागी होत नव्हते परंतु रविवारी मोठ्या संख्येने लोक यात सहभागी झाले. अचानक वाढलेल्या आंदोलनातील गर्दीमुळे तिथल्या सैन्याला रेड अलर्टवर ठेवले होते. 6 / 10रविवारी झालेल्या या आंदोलनाचा संबंध १९७२ च्या मार्शल लॉ घोषणेशी आहे. ज्याची घोषणा विद्यमान राष्ट्रपती मार्कोस यांच्या वडिलांनी केली होती. सोमवारी फिलीपींसचे राष्ट्रपती यांनी सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांची समिती नेमत भ्रष्टाचाराबाबत चौकशी सुरू केली आहे.7 / 10रविवारी लोक आंदोलनासाठी जमले, त्यावर बोलताना राष्ट्रपती मार्कोस यांनी लोकांचा राग व्यक्त होणे, त्यातून ते निराश आहेत. त्यांना न्याय हवाय ही मागणी करणे त्यात गैर काय? मी त्यांना दोषी मानत नाही असं मार्कोस यांनी म्हटलं. 8 / 10सोबतच या भ्रष्टाचारातील दोषी कुठल्याही मित्राला अथवा सहकाऱ्याला माफ केले जाणार नाही असं मार्कोस यांनी स्पष्ट केले. मार्कोस यांच्या भावाचे नाव भ्रष्टाचार प्रकरणात पुढे आले आहे. मात्र मार्कोस यांनी भावावरील आरोप नाकारले. 9 / 10मागील आठवड्यात एका बांधकाम कंपनीच्या मालकाने आरोप केला होता की, संसदेतील ३० सदस्यांनी रोकड लाच म्हणून घेतली आहे. त्यानंतर मार्कोस यांनी समिती गठीत करून याची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितला आहे. 10 / 10फिलीपींसमध्ये घोटाळ्याचा मोठा इतिहास आहे. याठिकाणी सार्वजनिक संपत्तीची लुट केली जाते. त्यात भ्रष्टाचारात एखादा दोषी अडकला तरीही त्याला जेलमध्ये जाण्यापासून वाचवले जाते. २०२३-२५ या २ वर्षाच्या कालावधीत फिलीपींस अर्थव्यवस्थेला २ अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचं अर्थ मंत्रालयाचे म्हणणं आहे.