बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 17:41 IST
1 / 5 गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या सत्तांतरापासून आजपर्यंत बांगलादेश हा अस्थिरतेच्या फेऱ्यात अडकलेला आहे. काळजीवाहू प्रमुख मोहम्मद युनूस यांचं सरकार कट्टर पंथीयांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. आता निवडणुका होऊन नवं सरकार स्थापन झाल्यावरच बांगलादेशमधील परिस्थिती बदलू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 2 / 5दरम्यान, बीएनपीच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान हे १७ वर्षांच्या निर्वासनानंतर बांगलादेशमध्ये परतले आहेत. देशात पाऊल ठेवताच त्यांनी बांगलादेशला बदललण्याची घोषणा केली आहे. याचदरम्यान, बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री झाली आहे. ही एंट्री खुद्द तारिक रहमान यांच्यासोबत झाली आहे. 3 / 5ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कुणी नसून जायमा रहमान आहे. बांगलादेशच्या जनतेली ती चांगलीच परिचित आहे. जायमा रहमान ही बीएनपी म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख बेगम खलिदा झिया यांची नात आणि तारिक रहमान यांची कन्या आहे. ती आता बांगलादेशच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत तिने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून दिले आहेत. 4 / 5जायमा रहमान ही तिचे वडील तारिक रहमान यांच्यासोबत हल्लीच बांगलादेशमध्ये परतली आहे, तसेच सोशल मीडियावरून लोक तिला बांगलादेशचं भविष्य असं संबोधत आहेत. तसेच बांगलादेशमधील जनता तिच्याकडे भविष्यातील शेख हसीना किंवा बेगम खालिदा झिया म्हणून पाहत आहेत. 5 / 5त्यामुळे जायमा रहमान ही निश्चितपणे बीएनपीची युवा चेहरा बनू शकते. तसेच पुढील निवडणुकीमध्ये पक्षाला नवी ताकद देऊ शकते. एका अर्थाने जायमा रहमान हिच्या रूपात बीएनपीला पुढच्या पिढीतील नेतृत्व मिळालं आहे. तसेच बांगलादेशमधील तरुण पिढीही तिच्यावर विश्वास ठेऊ शकते. जायमा तरुण पिढीची प्रतिनिधी आहे. तसेच ती परदेशात शिकून आलेली आहे. ती पेशाने वकील आहे. त्यामुळे तारिक रहमानसुद्धा तिला आपली उत्तराधिकारी घोषित करू शकतात.