शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:20 IST

1 / 10
अमेरिका आणि इराण यांच्यात एक महिन्याहून अधिक काळ युद्ध सुरू होते. अखेर या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला आहे. दोन्ही देशांनी युद्धविरामासाठी एक करार केला आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
2 / 10
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्या युद्धामुळे मध्य पूर्वेतील तणावाची स्थिती होती. या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले होते. अनेक देशांमध्ये ऊर्जा संकट निर्माण झाले होते. स्ट्रेट होर्मुझमधील जल वाहतूक ठप्प झाल्याने जागतिक ऊर्जा संकट ओढावले.
3 / 10
युद्धामुळे इराणने स्ट्रेट होर्मुझमधील वाहतूक रोखली होती. या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर हल्ले करण्याची धमकी इराणने दिली होती. त्यामुळे हा मार्ग ठप्प झाला होता. परंतु आता अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाल्यामुळे हा मार्ग पुन्हा सुरळीत करण्यावर सहमती झाली आहे. मात्र या युद्धामुळे एका इस्लामिक देशाचा सर्वात मोठा फायदा होताना दिसत आहे.
4 / 10
या देशाचं नाव आहे ओमान...इराण अमेरिका यांच्यातील युद्धविरामाशी निगडित अटींबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर ओमानची पकड आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. त्यामागे इराणचा प्रस्ताव कारणीभूत आहे.
5 / 10
इराणने अमेरिकेला जे १० कलमी युद्धविरामच्या अटी पाठवल्या आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची अट म्हणजे इराण आणि ओमान हे दोन्ही देश होर्मुझमधून प्रवास करणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल करू शकतात.
6 / 10
इराण आणि ओमान यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनी हा सुमारे ३४ किलोमीटर रुंदीचा मार्ग आतापर्यंत एक आंतरराष्ट्रीय जलमार्ग मानला जात होता, जिथे कोणताही टोल आकारला जात नव्हता. हा जगातील सर्वात महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक असून यावरून जगातील सुमारे २० टक्के तेल व्यापार होतो. ज्यामुळे तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
7 / 10
काय होती इराणची योजना? - इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांकडून टोल वसुली करण्याचं प्लॅनिंग केले आहे. ज्यात ओमानही त्याला साथ देईल. अमेरिकेसोबत युद्धविरामानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी जहाजांना होर्मुझमधून प्रवास करण्याची परवानगी इराणी सैन्याच्या परवानगीने दिली जाईल. त्यामुळे इराण होर्मुझवरील नियंत्रण मजबूत करेल की त्यात ढील देईल हे अद्याप स्पष्ट नाही.
8 / 10
प्लॅनिंगनुसार, इराण आणि ओमान या दोन्ही देशांच्या मधून जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांना टोल द्यावा लागेल. इराण या पैशांचा वापर देशातील पायाभूत विकासांच्या पुनर्निमितीसाठी करेल असं एका अधिकाऱ्याने सांगितले.
9 / 10
यापूर्वी इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनीही यावर भाष्य केले होते. ओमानसोबत एक करार विकसित केला जात आहे, ज्यानुसार जहाजांना होर्मुझमधून जाण्यासाठी परवानग्या आणि परवाने घेणे आवश्यक असेल. याचा उद्देश वाहतुकीत अडथळा आणणे नसून ती सुलभ करणे आहे असं त्यांनी सांगितले.
10 / 10
दरम्यान, ओमाननेही या मार्गावरून सुरळीत जहाजवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी इराणसोबत चर्चा सुरू केल्याची पुष्टी केली आहे. युद्धापूर्वी इराण किंवा ओमान यापैकी कोणीही असे शुल्क आकारत नव्हते. मात्र युद्धामुळे ओमानसाठी ही एक फायदेशीर संधी चालून आली आहे.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणCrude Oilखनिज तेलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प