जबरदस्त कामगीरी! ६२ तास स्पेसवॉक, ९०० तास संशोधन; सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात अडकूनही केले विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 09:46 IST
1 / 9भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या काही महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. त्या पुढील आठवड्यात पृथ्वीवर परतणार आहेत. त्या ९ महिन्यांपासून अडकल्या आहेत. या काळात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, पण त्यांचा घाबरल्या नाहीत.2 / 9दरम्यान, सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात घालवलेल्या वेळेबाबत काही महत्त्वाचे प्रयोग केले आहेत. त्यांनी ९०० तासांहून अधिक काळ संशोधन केले आहे.3 / 9आतापर्यंत, सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ मोहिमांमध्ये ६०० हून अधिक दिवस घालवले आहेत आणि एकूण ६२ तास ९ मिनिटे अंतराळात फिरल्या आहेत.4 / 9त्यांच्या मोहिमेदरम्यान, त्यांनी बोईंग स्टारलाइनर देखील उडवले, हे बोईंग बनवण्यासाठी त्यांनीही काम केले आहे.5 / 9आयएसएसवर त्यांनी अनेक गोष्टी बदलल्या, त्या स्वच्छ केल्या आणि भरपूर कचरा पृथ्वीवर परत पाठवण्यास मदत केली.6 / 9त्यांनी १५० हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभाग घेतला, एकूण ९०० तासांहून अधिक संशोधन केले.7 / 9सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बॅरी विल्मोर हे गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. 8 / 9गेल्या वर्षी ५ जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून दोघांनी त्यांचे पहिले क्रू फ्लाइट केले आणि ६ जून रोजी ते अंतराळ स्थानकावर पोहोचले - आठ दिवसांचे हे मिशन अखेर वाढवण्यात आले.9 / 9पृथ्वीवर परतल्यावर, सुनीता विल्यम्स चार वेगवेगळ्या स्पेस कॅप्सूल - स्पेस शटल, सोयुझ, बोईंग स्टारलाइनर आणि स्पेसएक्स क्रू ड्रॅगन उडवून आणखी एक विक्रम करतील.