शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:49 IST

1 / 10
देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणं हे दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. परंतु हा प्रवास इतका सोपा नाही. अनेक मुले कित्येक वर्ष मेहनत करूनही बऱ्याचदा अयशस्वी होतात, त्यातून काही नैराश्येतून माघार घेतात तर काही जिद्दीने प्रयत्न सुरूच ठेवतात.
2 / 10
काही जण आपल्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासाने पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचतात. अशीच एक कहाणी आहे दिव्या तंवर या तरुणीची, जिने मर्यादीत साधने असतानाही देशातील सर्वात कठीण परीक्षा यूपीएससीत यश मिळवून अनेकांसाठी प्रेरणादायी बनली.
3 / 10
हरियाणातील महेंद्रगढ जिल्ह्यातील रहिवासी दिव्या तंवर हिचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. तिने तिचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत आणि नंतर महेंद्रगढ येथील नवोदय विद्यालयातून पूर्ण केले. दिव्या नेहमीच एक हुशार विद्यार्थिनी होती.
4 / 10
अभ्यासात दिव्याची आवड इतकी प्रबळ होती की तिने विज्ञान विषयात पदवी पूर्ण केल्यानंतर लगेचच यूपीएससीची तयारी सुरू केली. २०२१ मध्ये दिव्याने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवत ऑल इंडिया रँक ४३८ नंबर पटकावला.
5 / 10
दिव्याने जेव्हा ही परीक्षा दिली, तेव्हा तिचे वय अवघे २१ वर्ष होते. दिव्याचे हे यश यासाठीही चर्चेत आले कारण तिने कुठल्याही कोचिंग संस्थेशिवाय स्वत:च्या मेहनतीने आणि जिद्दीवर अभ्यास करत ही परीक्षा पास केली होती.
6 / 10
दिव्या एवढ्यावरच थांबली नाही तर तिने पुढच्या वर्षी पुन्हा २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. मात्र यावेळी तिला मिळालेल्या यश आधीच्या यशापेक्षा दुप्पट होते. कारण या परीक्षेत तिने दमदार कामगिरी करत ऑल इंडिया रँकिंगमध्ये १०५ नंबर पटकावला. या रँकिंगमुळे ती आयएसएस बनली.
7 / 10
दिव्याच्या कठोर परिश्रमासोबतच तिच्या आईनेही या घवघवीत यशात महत्त्वाची भूमिका बजावली. वडिलांची साथ लवकर गेल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवर पडली. तिची आई तीन मुलांचे संगोपन करण्यासाठी मजूर म्हणून काम करत होती मात्र तिने दिव्याच्या शिक्षणात कधीही अडथळा येऊ दिला नाही.
8 / 10
जर माझ्या आईने धाडस केले नसते तर मी आज जिथे आहे तिथे पोहोचली नसती असं दिव्या अनेकदा म्हणते. दिव्याला आयएएस अधिकारी होण्याची प्रेरणा तिच्या शालेय जीवनातच मिळाली. एकदा एक आयएएस अधिकारी तिच्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.
9 / 10
या पाहुण्यांचा गणवेश, त्याचे व्यक्तिमत्व आणि समाजाप्रती असलेली जबाबदारीची जाणीव दिव्यावर खोलवर प्रभाव पाडली. त्या दिवसापासून तिने आयएएस अधिकारी बनून देशाची सेवा करण्याचा निर्धार केला. आज दिव्या तंवर सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे.
10 / 10
दिव्याचे इंस्टाग्रामवर जवळपास ९०,००० फॉलोअर्स आहेत. ती वारंवार तिच्या प्रवासाबद्दल, संघर्षांबद्दल आणि प्रेरक पोस्टबद्दलच्या कथा शेअर करते. तिचे शब्द केवळ यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आयुष्यात पुढे जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकालाही प्रेरणा देतात.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग