शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात साथरोगांपासून मुलांना दूर कसे ठेवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:30 IST

1 / 7
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, व्हायरल ताप, सर्दी-खोकला, अन्न-विषबाधा यांसारखे अनेक संसर्गजन्य रोग वाढतात. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती प्रौढांपेक्षा कमी असते, त्यामुळे त्यांना या रोगांचा धोका जास्त असतो. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
2 / 7
या साथींच्या रोगांचा धोका - हिवताप, डेंग्यू, झिका, इन्फ्लुएंझा, इन्फ्लुएंझा ए, कावीळ, कॉलरा, टायफॉइड, तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस, लेप्टोस्पयरोसिस, फंगल इन्फेक्शन यासारखे आजार होऊ शकतात.
3 / 7
पाणी उकळून प्या : पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे घरी येणारे पाणी उकळून प्यावे. उघड्यावरचे
4 / 7
अन्नपदार्थ ३ खाऊ नका : शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. कारण याकाळात त्या 3 पदार्थामधून जंतुसंसर्गाची लागण होऊ शकते.
5 / 7
साचलेल्या पाण्यातून जाऊ नका : साचलेल्या पाण्यातून चालण्यास मुलांना मज्जाव करा. कारण त्याद्वारे लेप्टोस्पयरोसिस होण्याची शक्यता असते.
6 / 7
पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांमुळे ताप येतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. घरच्या घरी उपचार न करता डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या, त्यांनी सांगितलेल्या चाचण्या करून आजाराची निदान निश्चित करून घेणे गरजेचे आहे.
7 / 7
पावसाळ्यात साथीचे आजार उद्भवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. या काळात ताप आल्यास स्वतःच घरच्या घरी उपचार करू नये. डॉक्टरांकडून आजाराचे निदान करून त्यावर वेळीच उपचार करून घेणे गरजेचे आहे - डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय
टॅग्स :RainपाऊसHealth Tipsहेल्थ टिप्स