शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Street Goggles: तुम्हीही रस्त्यावरुन 'गॉगल' खरेदी करताय, मग सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 1:21 PM

1 / 9
मार्चची सुरुवात झाली अन् उन्हाच्या झळा बसायला लागल्या. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी आणि डोळ्यावर गॉगल हे गरजेचं बनलं आहे. त्यासाठी, अनेकजण रस्त्यावरील गॉगल खरेदी करतात.
2 / 9
उन्हात फिरले तर डोळे लाल होतात, जळजळ करतात अथवा डोळ्यांमध्ये कचरा जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांना संरक्षण मिळावे म्हणून बहुतांशी जण कुठलीही तपासणी न करता दुकानातून गॉगल घेतात.
3 / 9
मात्र, आपण घेतलेला गॉगलचा दर्जा काय आहे, तो कोणत्या रंगाचा आहे हे तपासणेही गरजेचे असते. तो वापरण्यापूर्वी डॉक्टरांना विचारणा केली का, हेही तपासायला हवं.
4 / 9
ज्यांना डोळ्याचा त्रास आहे ते डॉक्टरकडे तपासणी करतात. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गॉगल किंवा चष्मा वापरतात.
5 / 9
मात्र, ज्यांना डोळ्याचा काही त्रास नाही, असे बहुतांशी जण फॅशन म्हणून अथवा उन्हापासून संरक्षणासाठी गॉगल वापरतात. मात्र, डॉक्टरांचा सल्ला न घेता गॉगल वापरणे घातक ठरू शकते.
6 / 9
डोळ्यांची काळजी घ्यावी - उन्हात फिरता टोपी वापरावी, डोळे गार पाण्याने स्वच्छ करणे, व्हिटॅमिनयुक्त आहार घेणे
7 / 9
नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी न करता बहुतांशी जण गॉगल, चष्मा वापरतात. यामुळे तात्पुरते संरक्षण मिळते.
8 / 9
मात्र, गॉगल जर हलक्या दर्जाचा असेल आणि तो उन्हात वापरला तर डोळे जळजळणे, डोके दुखणे अथवा त्या गॉगलच्या रंगापासून डोळ्यांना अपाय होण्याची शक्यता असते.
9 / 9
एखाद्याला डोळ्याचा नंबर असेल आणि त्याने नंबरचा चष्मा वापरला नाही तर तेही घातक ठरू शकते. त्यामुळे रस्त्यावर मिळणारे गॉगल वापरणे हे शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गॉगल, चष्मा वापरावा. - डॉ. संतोष रासकर, नेत्रतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय
टॅग्स :eye care tipsडोळ्यांची निगाHealthआरोग्यroad safetyरस्ते सुरक्षाdoctorडॉक्टर