अवघ्या जगाचे डोळे असलेल्या लसीची चाचणी अपूर्ण; तरीही उत्पादनाला सुरूवात?, वाचा WHO ची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 13:39 IST
1 / 8जागतिक आरोग्य संघटनेनं सगळ्यात आधी लस तयार केल्यानंतर रशियाच्या या दाव्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2 / 8जागतिक आरोग्य संघटनेनं सगळ्यात आधी लस तयार केल्यानंतर रशियाच्या या दाव्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे रिजनल ब्रांच पॅन ऑर्गेनाइजेशनचे असिस्टेंट डायरेक्टर यांनी सांगितले की, रशियाच्या लसीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत उत्पादनाला सुरूवात करू नये.3 / 8रॉयटर्सनं दिलेल्या रिपोर्टनुसार जागतिक आरोग्य संघटनेचे रीजनल ब्रांच पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गेनाइजेशनचे असिस्टेंट डायरेक्टर जरबास बारबोसा यांनी सांगितले की, WHO ला रशियाच्या लसीबाबत माहिती पाठवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे लसीचे मुल्यांकन केले जाईल. 4 / 8जरबास बारबोसा यांना जेव्हा ब्राजीलमध्ये रशियाच्या लसीच्या उत्पादनासंबंधी विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यतील चाचणी पूर्ण झाल्याशिवाय रशियानं उत्पादनाला सुरूवात करू नये. 5 / 8तसंच ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याची खात्री असणंही महत्वाचं आहे. 6 / 8याआधी मंगळवारी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी रशियाची कोरोनाची लस यशस्वीरित्या तयार केल्याचा दावा केला होता. ही लस सगळ्या चाचणी प्रकियांमधून गेल्याचं त्यांनी सांगितलं. पण तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली नसल्यामुळे अनेक देशांमधून रशियाच्या लसीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 7 / 8जरबास बारबोसा यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणतीही लस तयार करताना सुरक्षेसंबंधी गाईडलाईन्सचं पालन करणं गरजेचं आहे. 8 / 8जरबास बारबोसा यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणतीही लस तयार करताना सुरक्षेसंबंधी गाईडलाईन्सचं पालन करणं गरजेचं आहे.