1 / 9गेल्या दीड वर्षांपासून जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला होता. तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट्समुळे लोकांच्या समोरील चिंताही वाढल्या आहे. अशा परिस्थितीत लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 2 / 9तर दुसरीकडे कोरोनाच्या अन्य व्हेरिअंट्सवर लसीचे केवळ दोन उपयुक्त नसल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील लस उत्पादक कंपनी फायझर लसीच्या तिसऱ्या डोसच्या तयारीत आहे. 3 / 9कोरोनावर मात करण्यासाठी लसीच्या तिसऱ्या डोसची आवश्यकता असल्याचं मत कंपनीकडून व्यक्त करण्यात आलं. 4 / 9तसंच येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये लसीच्या तिसऱ्या डोसच्या मंजुरीसाठी नियामकाकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 5 / 9सध्या लसीच्या तिसऱ्या डोसबद्दल चाचणी पूर्ण झाली आहे आणि अंतरिम चाचणीच्या डेटाच्या आधारावर मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.6 / 9सुरुवातीच्या आकडेवारीनुसार पहिल्या डोसच्या तुलनेत लसीचा तिसरा डोस शरीरातील अँटिबॉडीजमध्ये पाच ते दहा टक्क्यांची वाढ करतो. 7 / 9कंपनीनंच्या म्हणण्यानुसार लसीचा तिसरा डोस हा दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीनं बुस्टर डोस म्हणून दिला जाईल. 8 / 9लसीच्या तिसऱ्या डोसनंतर कोरोनाच्या बिटा (B.1.351) विरोधात उत्तम सुरक्षा मिळणार आहे. 'इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगातील आकडेवारीकडे पाहिल्यानंचक संसर्ग आणि लक्षणांसंबंधी रोग दोन्हींना रोखण्यासाठी लसीकरणाच्या सहा महिन्यांनंतर घरसरण दिसून आली आहे,' असं फायझरनं म्हटलं आहे. परंतु गंभीर आजारांपासून रोखण्यासाठी लस प्रभावी असल्याचं म्हटलं आहे.9 / 9'सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचाही प्रादुर्भाव अनेक देशात वाढत आहे. अशा परिस्थितीत आकडेवारीनुसार संपूर्ण लसीकरणानंतर सहा ते बारा महिन्यांमध्ये तिसऱ्या डोसची गरज भासू शकते,' असंही कंपनीनं म्हटलं आहे.