ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आयुष्यमान भारतमध्ये सगळेच आजार कव्हर नाहीत; इथे तपासा, नाहीतर अडकाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 18:45 IST
1 / 9केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना राबविली आहे. या योजनेतून गोर गरीब रुग्ण त्यांच्यावरील उपचार कमी खर्चात किंवा मोफत करू शकणार आहेत. 2 / 9सर्वच हॉस्पिटल या योजनेशी संलग्न नाहीत, तसेच सर्वच आजारही या योजनेत येत नाहीत. यामुळे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर समजण्यापेक्षा आधीच कोणते कोणते आजार आयुष्यमान योजनेत येत नाहीत ते समजले तर पुढील अडचण होणार नाही.3 / 9आयुष्यमान भारत योजनेत पात्र असलेल्या लोकांचे आयुष्यमान कार्ड बनविले जाते. यानंतर या कार्डधारकांना संलग्न हॉस्पिटलमध्ये पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात होते. 4 / 9प्रत्येक वर्षासाठी पाच लाख रुपयांचे उपचार मोफत आहेत. परंतू, यात काही आजारांवर उपचार येत नाहीत. असे आजार कोणते याची माहिती तुम्हाला नसेल. अनेकदा हेल्थ इन्शुरन्समध्ये या गोष्टी येतात आणि त्या रुग्णाला लाखो रुपये खर्च करावे लागतात. 5 / 9जर तुम्ही आयुष्यमान कार्ड धारक असाल आणि तुम्हाला कोणत्या आजारांवर उपचार करता येतात आणि कोणत्या नाही हे जर पहायचे असेल तर तुम्ही कॉम्प्युटर आणि मोबाईलद्वारे तपासू शकता.6 / 9या योजनेची https://pmjay.gov.in/ ही वेबसाईट आहे. त्यावर जावे लागणार आहे. 7 / 9वेबसाईट उघडल्यावर तिथे मेन्यू म्हणून पर्याय दिसेल, त्यावर गेल्यावर 'Health Benefits Packages' वर क्लिक करावे.8 / 9यामध्ये तुम्ही कोणत्या आजारांवर मोफत उपचार करू शकत नाही, हे समजणार आहे. 9 / 9याचबरोबर तुम्ही हेल्पलाइन नंबर 14555 वर कॉ़ल करूनही माहिती घेऊ शकता.