वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी WHO ने दिला सल्ला, जाणून घ्या निरोगी राहण्याच्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 18:33 IST
1 / 10कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळे लोकांना घरी थांबण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत काम थांबू नये म्हणून वर्क फॉर्म होम करायला लोकांनी सुरूवात केलेली आहे. कार्यालयं पूर्णपणे बंद असून सगळीकडे शुकशुकाट पसरलेला आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून घरून काम करत असलेल्या लोकांसाठी जगतिक आरोग्य संघटनेने काही मह्त्वपूर्ण सुचना ट्विटर द्वारे दिल्या आहेत. याबद्दल माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.2 / 10बराच वेळ कम्प्युटर समोर बसू नका, एकाच ठिकाणी बराच वेळ बसून काम करू नका.3 / 10काम करत असताना सतत दर अर्ध्या तासाला किमान तीन मिनिटे उठा आणि आपल्या शरीराच्या मसल्सला स्ट्रेच करा.4 / 10डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून लपासून लॅपटॉपपासून काही अंतर ठेवा.5 / 10घराच्या पायऱ्यांवरून वर-खाली करा. हे किमान ४-५ वेळा करा. असे केल्याने शरीराचा थकवा कमी होईल आणि शरीरातील स्नायूही उघडतील.6 / 10दर १५ किंवा २० मिनिटांनी एकत्र आपले हात चोळा आणि थोड्या काळासाठी डोळ्यांवर ठेवा. असे केल्याने डोळ्यांना आराम मिळेल.7 / 10काम करत असताना मध्ये ब्रेक घेत जा आणि घरात फेरी मारून पुन्हा कामासाठी बसा.8 / 10या ट्विटमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केवळ घरातून काम करणाऱ्यांनाच सूचना दिल्या नाहीत तर घरातील इतर लोक स्वतःला निरोगी कसे ठेवू शकतात यासाठीही आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.9 / 10 घरात हलका व्यायाम केल्याने शरीराला बरीच शक्ती आणि सामर्थ्य मिळते. अशा परिस्थितीत म्युझिकसोबत डान्स हा एक उत्तम पर्याय आहे.10 / 10 शरीराला थोडे स्ट्रेच करा. यासाठी, योग्य सकाळी आणि संध्याकाळी आहे, परंतु जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण हे करू शकता.