शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

टॉयलेट साफ करताना दोन क्लीनर एकत्र वापरणे ठरतेय 'सायलेंट किलर'; चुकूनही करू नका 'हा' प्रयोग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 19:41 IST

1 / 9
एका महिलेने बाथरूम साफ करताना दोन वेगवेगळे क्लीनर (उदा. ॲसिड आणि ब्लीच) एकत्र मिसळले. तिला वाटले की दोन केमिकल्स एकत्र केल्याने स्वच्छता 'डबल' होईल. मात्र, दोन्ही क्लीनर एकत्र येताच त्यातून विषारी वायूची निर्मिती झाली.
2 / 9
काही मिनिटांतच त्या महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ती बेशुद्ध पडली. घरच्यांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे तिचे प्राण वाचू शकले.
3 / 9
जेव्हा आपण दोन वेगळे क्लीनर एकत्र करतो, तेव्हा त्यांच्यातील घटकांमध्ये रासायनिक प्रक्रिया होते. यामुळे डोळ्यांना न दिसणारे पण अत्यंत विषारी वायू तयार होतात
4 / 9
अनेक टॉयलेट क्लीनर्समध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असते. जेव्हा ते ब्लीच (सोडियम हायपोक्लोराइट) सोबत मिसळले जाते, तेव्हा 'क्लोरीन गॅस' तयार होतो. यामुळे डोळे, नाक आणि घशात प्रचंड जळजळ होते आणि श्वास कोंडतो.
5 / 9
अमोनियायुक्त क्लीनर (काच साफ करण्याचे लिक्विड) आणि ब्लीच एकत्र केल्यास 'क्लोरामाइन गॅस' तयार होतो. याने छातीत दुखणे, मळमळणे आणि फुफ्फुसात पाणी भरणे असे गंभीर आजार होऊ शकतात.
6 / 9
ब्लीच आणि रबिंग अल्कोहोल एकत्र केल्यास 'क्लोरोफॉर्म' तयार होतो. यामुळे चक्कर येणे किंवा व्यक्ती बेशुद्ध पडणे असे प्रकार घडतात, जे बंद बाथरूममध्ये जीवघेणे ठरू शकतात.
7 / 9
दोन क्लीनरच्या मिश्रणातून निघणारा धूर हुंगल्यामुळे 'रिएक्टिव्ह एअरवेज डिसफंक्शन सिंड्रोम' नावाचा आजार होऊ शकतो. हा अस्थमासारखाच एक गंभीर प्रकार आहे. यामुळे फुफ्फुसांच्या नळ्या इतक्या संवेदनशील होतात की, साधी धूळ किंवा परफ्यूमच्या वासानेही त्या व्यक्तीला अस्थमाचा अटॅक येऊ शकतो.
8 / 9
त्यामुळे बाथरूम साफ करताना दोन क्लीनर एकत्र करून कोणताही प्रयोग करू नका. तसेच बाटलीवर दिलेल्या सूचना नेहमी वाचा. बाथरूम साफ करताना खिडकी उघडी ठेवा आणि एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवा.
9 / 9
जर दुसरे क्लीनर वापरायचे असेल, तर आधीचे क्लीनर पाण्याने पूर्णपणे धुवून टाका. साफसफाई करताना चक्कर आली किंवा श्वास घ्यायला त्रास झाला, तर त्वरित बाहेर मोकळ्या हवेत या. जर चुकून केमिकल्स मिक्स झाले आणि त्रास सुरू झाला, तर घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर