Blood Sugar लेव्हल कंट्रोल करण्यासाठी 'या' आहेत सोप्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 16:56 IST
1 / 7रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना हे करावा लागतो. विशेषत: मधुमेह असलेल्या लोकांना जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत त्या जाणून घेऊया. 2 / 7व्यायाम करणं हे शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. वजन कमी करण्यासाठी तसेच इन्सुलिनच्या प्रमाणावर कंट्रोल ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचा असतो. शुगर लेवल मेनटेन ठेवण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असतो. 3 / 7आहारात प्रामुख्याने फायबरचा समावेश करा. भाज्या आणि फळांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. 4 / 7दररोज योग्य प्रमाणात पाणी नक्की प्या. शरीर हायड्रेट असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. 5 / 7काही जणांना एकाच वेळी खूप खाण्याची सवय असते. मात्र असं करू नका. थोड्या थोड्या वेळाने पदार्थ खा. यामुळे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहील. 6 / 7स्ट्रेस वाढला की त्याचा शरिरावर देखील परिणाम होतो. स्ट्रेसमुळे शरिरातील ग्लूकेगन आणि कॉर्टिसोल हॉर्मोन रिलीज होतात आणि शुगर लेवल देखील वाढते. त्यामुळे कामाचा अथवा इतर गोष्टींचा स्ट्रेस घेऊ नका. 7 / 7टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.