म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 15:36 IST
1 / 6आजारी असल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. डॉक्टरही लवकर बरं व्हावं यासाठी काही औषधं देतात. मात्र औषधं घेताना काही पदार्थांपासून लांब राहणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं. हे पदार्थ कोणते जाणून घेऊया. 2 / 6काही औषधं ही गरम द्रव्यासोबत घेणं चांगलं नसतं. चहा, कॉफी किंवा अनेक गरम वस्तूंसोबत औषधं घेऊ नका. 3 / 6संत्र, लिंबू, द्राक्ष अशा आंबट फळांच्या रसाचं सेवन करू नका. तसेच औषधं घेताना लोणचं, चिंच अशा ही आंबट गोष्टीही खाऊ नका. 4 / 6केळ्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असल्याने ते शरीरासाठी चांगलं असतं. मात्र ब्लडप्रेशरची औषधं घेताना केळ खाऊ नका. 5 / 6औषधांचं सेवन केल्यावर लगेचच दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करू नका कारण यामुळे रिअॅक्शन होऊ शकते. 6 / 6औषधं घेतल्यावर चुकून सुद्धा सोडा अथवा कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करू नका. शरीरासाठी असं करणं घातक ठरू शकतं.