By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 16:20 IST
1 / 10काही आठवड्यापूर्वी भारतीय कंपनी सिप्लाने दावा केला होता की , सहा महिन्यांच्या आत कोरोनावर औषध तयार केलं जाईल. आत्तापर्यंत कोरोनासाठी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि एचआयव्ही साठी वापरात असेलल्या औषधांचा वापर करण्यात आला आहे. सध्या कोरोनाच्या उपचारांसाठी आशेचा किरण ठरणारं सेप्सिवॅक या औषधाच्या ट्रायल साठी मंजूरी देण्यात आली आहे.2 / 10काही आठवड्यापूर्वी भारतीय कंपनी सिप्लाने दावा केला आहे की , सहा महिन्यांच्या आत कोरोनावर औषध तयार केलं जाईल. आत्तापर्यंत कोरोनासाठी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि एचआयव्ही साठी वापरात असेलल्या औषधांचा वापर करण्यात आला होता. सध्या कोरोनाच्या उपचारांसाठी आशेचा किरण ठरणारं सेप्सिवॅक या औषधाच्या ट्रायल साठी मंजूरी देण्यात आली आहे.3 / 10सेप्सिवॅक या औषधाची निर्मीती कॅडीला फार्मास्यूटिकल्स लिमिटेडने केली आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया (DCGI) ने या औषधाच्या तपासणीची मान्यता दिली आहे. CSIR त्या सहयोगाने तीन रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर चाचणी केली जाणार आहे. यात देशातील पोस्ट ग्रॅजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एज्यूकेशन एंड रिसर्च, चंडीगड, एम्स दिल्ली आणि भोपाळचा समावेश आहे. 4 / 10सेप्सिवॅक औषधाचा वापर ज्या आजारांसाठी केला जातो. त्याची लक्षणं कोरोनाच्या लक्षणांप्रमाणे आहेत. हे औषध सीएसआईआर च्या ‘न्यू मिलेनियम इंडियन टेक्नोलॉजी’ या उपक्रमा अंतर्गत तयार करण्यात आले होतं. कॅडिला फार्मास्यूटिकल्सद्वारे तयार करण्यात आलेल्या या औषधाचा वापर एंटी ग्राम सेप्सिसमध्ये केला जातो.5 / 10श्वास घ्यायला त्रास होण, फुप्फुसांमध्ये वेदना असे सेप्सिसचे आजार बॅक्टेरिअल संक्रमणामुळे होतात. या औषधामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. या कारणामुळे कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी या औषधाची चाचणी केली जाणार आहे.6 / 10सेप्सिक एक आजार आहे. ज्यात रुग्णाला बॅक्टेरिअल इन्फेक्शन होतं. बीबीसीने दिलेल्या माहिती नुसार शरीराच्या कोणत्याही भागावर जखम झाल्यास, किडा चावल्यानंतर संक्रमण झाल्यामुळे हा आजार होतो. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन व्हायरसचा प्रसार संपूर्ण शरीरात वेगाने होतो. 7 / 10परिणामी किडनी, लिव्हर हे अवयव व्यवस्थित काम करत नाही. गंभीर परिस्थितीत मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते. तेव्हा सेप्सिवॅक ही गोळी फायदेशीर ठरते. 8 / 10सेप्सिवॅकमध्ये मायकोबॅक्टेरिअम असतात. त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती वाढवता येऊ शकते. या औषधामुळे मृत्यूदर ५० टक्के कमी होत असल्याची माहिती माध्यामांनी दिली आहे. म्हणून कोरोनाच्या उपचारांसाठी सेप्सिवॅकचा वापर केला जाणार आहे. 9 / 10सेप्सिवॅकची पहिली चाचणी आयसीयूत असलेल्या कोरोना रुग्णांवर केली जाणार आहे. दुसरी चाचणी आयसीयूमध्ये नसलेल्या रुग्णांवर केली जाणार आहे. तिसरी चाचणी कोरोनाच्या संक्रमणातून चांगल्या झालेल्या रुग्णांवर केली जाणार आहे. कोरोनाच्या आजारावर सेप्सिवॅक किती प्रभावी ठरेल हे चाचणी झाल्यानंतर निदर्शनास येईल.10 / 10सेप्सिवॅकची पहिली चाचणी आयसीयूत असलेल्या कोरोना रुग्णांवर केली जाणार आहे. दुसरी चाचणी आयसीयूमध्ये नसलेल्या रुग्णांवर केली जाणार आहे. तिसरी चाचणी कोरोनाच्या संक्रमणातून चांगल्या झालेल्या रुग्णांवर केली जाणार आहे. कोरोनाच्या आजारावर सेप्सिवॅक किती प्रभावी ठरेल हे चाचणी झाल्यानंतर निदर्शनास येईल.