शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccination: कोरोना लसीबद्दल तुमच्याही मनात आहेत प्रश्न?; जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं

By कुणाल गवाणकर | Published: January 16, 2021 1:55 PM

1 / 11
देशात कोरोना संकटाचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. आजपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानास प्रारंभ केला.
2 / 11
कोरोना लसीकरणाबद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आपल्याला लस कधी, कशी, केव्हा मिळणार, कोणाला लस मिळणार नाही, असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी...
3 / 11
प्रश्न- आजपासून कोणाला लस दिली जाणार? उत्तर- आज आणि पुढील तीन सेशन्समध्ये केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल.
4 / 11
प्रश्न- पहिल्या टप्प्यातील लसीकरणात वयाची मर्यादा असणार का? उत्तर- १८ वर्षांच्या वरील व्यक्तींनाच कोरोना लस टोचली जाईल.
5 / 11
प्रश्न- मला लस कधी मिळणार, याची माहिती कशी मिळेल? उत्तर- कोविन सॉफ्टवेअरवरून मोबाईलवर मेसेज पाठवला जाईल. पहिल्या दोन टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील आणि आजारांचा सामना करणाऱ्यांना लस दिली जाईल.
6 / 11
प्रश्न- कुठे नोंदणी करावी लागेल का? उत्तर- लसीकरण करून घ्यायचं असल्यास को-विन (co-win) ऍपवर स्वत:ची नोंदणी करून घ्यावी लागेल.
7 / 11
प्रश्न- लसीकरणासाठी पैसे मोजावे लागतील की ते नि:शुल्क असेल? उत्तर- पहिल्या टप्प्यातलं लसीकरण मोफत आहे. त्यानंतरचं लसीकरण मोफत असेल की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
8 / 11
प्रश्न- खासगी पद्धतीनं लसीकरणाचा पर्याय आहे का? उत्तर- सध्या लस बाजारात उपलब्ध झालेली नाही. त्यासाठीचा परवाना मिळाल्यावर सरकारच्या मंजुरीनंतर बाजारात लस उपलब्ध होईल. पुढील दोन-तीन महिन्यात लस बाजारात उपलब्ध होऊ शकते किंवा यापेक्षा जास्त वेळदेखील लागू शकतो.
9 / 11
प्रश्न- लहान मुलांनादेखील लस दिली जाईल? उत्तर- कोरोना लसींची चाचणी १८ वर्षांवरील व्यक्तींवरच झाली आहे. त्यामुळे लहान मुलांना आता लस दिली जाणार नाही.
10 / 11
प्रश्न- पुढील डोज कधी मिळणार? उत्तर- पुढील डोज सरकारकडून २८ दिवसांनंतर दिला जाईल. दोन डोजमध्ये ४ ते ६ आठवड्यांचं अंतर असावं, असं कोविशील्ड लस तयार करणाऱ्या सीरमनं म्हटलं आहे.
11 / 11
प्रश्न- कोणत्या कंपनीची लस घ्यायची ते मी निवडू शकतो/शकते का? उत्तर- सध्या तरी हा पर्याय उपलब्ध नाही. बाजारात लस उपलब्ध झाल्यावर नागरिकांकडे हा पर्याय असू शकेल.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस