1 / 6तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्याआधी पाणी प्यायची सवय असेल, तर तुमच्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. यामुळे तुमची पचनसंस्था चांगली राहते आणि तोंडात बॅक्टेरियाही जमा राहत नाहीत. 2 / 6दररोर सकाळी पाणी प्यायल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती सूदृढ राहते. तसेच ज्या लोकांना नेहमी सर्दी, ताप यासारख्यी लक्षणे आहेत त्या लोकांनी दररोज सकाळी ब्रश करण्याआधी कोमट पाणी प्यायला हवं. 3 / 6दररोज सकाळी दात ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत मिळते आणि केस चमकदार होतात. पण त्यासाठी तुम्हाला नियमितपिणे सकाळी उठल्यानंतर पाणी प्यावं लागणार आहे. 4 / 6जे उच्च रक्तदाबाचे रूग्ण आहेत त्यांनी दररोज सकाळी पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवं. सकाळी उठल्यानंतर साधं पाणी किंवा कोमट पाणी प्यायला हवं. यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.5 / 6सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे फक्त उच्च रक्तदाबचे रुग्णच नाही तर मधुमेही रूग्णांनाही फायदा होतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्याधी पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवी. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.6 / 6अर्थात कुठल्याही गोष्टीचे अतीप्रमाण सेवन करू नये तसेच आपल्यासाठी योग्य गोष्टी शरीर आपल्याला स्वतः सांगत असते. कुठल्याही गोष्टीचा त्रास होत असेल तो प्रयोग किंवा ती सवय ताबोडतोब थांबवावा...