शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health: डोक्यावरील केसांतील खाजेमुळे त्रस्त आहात? हे घरगुती उपचार देतील आराम, खाज होईल गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 11:07 IST

1 / 6
थंडी आणि खाण्यापिण्यामधील गडबडीमुळे डोक्यातील खाज आणि डँड्रफमुळे अनेकजण त्रस्त असतात. आज आम्ही त्यांच्यासाठी दही, लिंबू, नारळाचं तेल आणि कांद्यापासून करण्यात येणाऱ्या काही घरगुती उपचारांबाबत माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्लाहा आराम मिळू शकतो.
2 / 6
डोक्यात होणाऱ्या खाजेवर दही, लिंबू, नारळाचं तेल, कापूर आणि कांद्यापासून केलेले घरगुती उपाय उपयुक्त ठरतात. त्यांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे.
3 / 6
दही - डोक्यातील खाजेपासून सुटका करून घेण्यासाठी दह्याने डोक्यावर मालीश करा. आठवड्यातून तीन ते ४ दिवस असं मालिश करा. त्यामुळे तुमचे केस चमकदार आणि मुलायम होती. तसेच ड्रँड्रफपासूनही मुक्तता होईल.
4 / 6
लिंबू - खाजेपासून सुटका करून घेण्यासाठी लिंबूही फायदेशीर आहे. त्यासाठी कापलेलं लिंबू किंवा लिंबाचा रस घ्या. तो केसांच्या मुळापर्यंत लावा. काही वेळ तसाच ठेवल्यानंतर तुम्ही तुमचं डोकं धुवू शकता. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते. ते बॅड बॅक्टेरियाला मारते. त्यामुळे तुमच्या डोक्यातील इतर समस्यासुद्धा संपुष्टात येतात.
5 / 6
नारळाचं तेल आणि कापूर - डोक्यातील केसांत होणाऱ्या खाजेवर नारळाचं तेल आणि कापूरसुद्धा उपयुक्त आहेत. नारळाचं तेल आणि कापूर संसर्गाशी लढतात. त्यासाठी तुम्हाला केवळ नारळाच्या तेलामध्ये मिसळायचे आहे. तसेच दररोज त्याचा वापर करावा,. नारळाचं तेल केसांसाठी उत्तम असते.
6 / 6
कांद्याचा रस डोक्यातील खाजेवर गुणकारी आहे. त्यासाठी तुम्हाला कांदा किसून कॉटनच्या कपड्याच्या मदतीने त्याचा रस काढला पाहिजे. त्यानंतर या रसाने केसांच्या मुळापर्यंत मालिश करावं. सुमारे १५ मिनिटे ठेवल्यानंतर केस धुवून टाकावेत.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल