शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: लसीचं कवचही कोरोनापासून वाचवू शकणार नाही?; चिंता आठपटीनं वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 16:40 IST

1 / 8
देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद देशात व्हायची. त्यानंतर हा आकडा खाली आला.
2 / 8
आता देशात दररोज ५० हजारांहून कमी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र नेचर मासिकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनानं सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.
3 / 8
कोरोनाच्या इतर कोणत्याही व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटची रोगप्रतिकारशक्तीला चकवा देण्याची क्षमता अधिक आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरातील अँटिबॉडी असोत वा लसीमुळे तयार झालेल्या अँटिबॉडी असोत, डेल्टा व्हेरिएंट चकवा देण्यात सक्षम असल्याची माहिती नेचरमध्ये प्रकाशित झाली आहे.
4 / 8
नेचरमध्ये प्रसिद्ध झालेला लेख भारतासह जगभरातील संशोधकांनी लिहिला आहे. डेल्टा व्हेरिएंटचा पहिला रुग्ण गेल्या वर्षीच्या अखेरीस भारतात सापडला होता. याच व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती.
5 / 8
मूळ कोरोना विषाणूच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट कोरोना लसीमुळे निर्माण झालेल्या रोगप्रतिकारशक्तीला चकवा देण्यात आठपट सक्षम आहे, अशी माहिती नेचरनं प्रकाशित केलेल्या संशोधनात आहे. ऍस्ट्राझेनेका आणि फायझरची लस देण्यात आलेल्या व्यक्तींचा अभ्यास करून हा माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
6 / 8
कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे त्यांना काही काळ कोरोनापासून संरक्षण मिळतं. मात्र या अँटिबॉडीजला चकवा देण्याची क्षमता डेल्टा व्हेरिएंटमध्ये आहे आणि कोरोनाच्या मूळ विषाणूच्या तुलनेत ती सहापटीनं अधिक आहे. त्यामुळेच जगभरात डेल्टा व्हेरिएंटनं थैमान घातलं आहे.
7 / 8
संशोधकांनी दिल्लीतल्या तीन रुग्णालयांतील ९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली. त्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते. यातल्या २१८ जणांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली. त्यांनी कोविशील्ड लस घेतली होती.
8 / 8
संशोधनातून समोर आलेल्या माहितीमुळे लस घेतलेल्यांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट न आल्यास हे संकट लवकर संपेल असं म्हटलं जात होतं. मात्र आता डेल्टा व्हेरिएंट कहर करत असल्यानं चिंतेत भर पडली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस