1 / 11भारतात एकीकडे कोरोनाचा व्हेरिएंट B.1.617.2 चा वेगाने फैलाव होत आहे. तर त्यात झालेले एक म्यूटेशन वैज्ञांनिकांसाठी नवे आव्हान म्हणून समोर आले आहे. याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये झालेल्या T478K म्यूटेशनवर जगातील टॉप लॅब्सचे लक्ष आहे. B.1.617.2 च्या वेगाने होणाऱ्या संक्रमणामागे हाच म्यूटेशन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.2 / 11महत्वाची आणि चिंतेची बाब म्हणजे, T478K म्यूटेशनसंदर्भात अद्याप अधिक माहिती मिळालेली नाही. त्यातही आश्चर्याची गोष्ट ही, की हा म्यूटेशन B.1.617 च्या इतर प्रकारांत आढळलेला नाही.3 / 11वेगाने पसरत असलेल्या मॅक्सिकन व्हेरिएंटमध्येही T478K म्यूटेशन असल्याचेही नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. यामुळेच संक्रमनाचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे. INSACOG चे वैज्ञानिक आणि इंस्टिट्यूट ऑफ जिनोमिक बायोलॉजी इन इंडियाचे संचालक अनुराग अग्रवाल यांनीही, T478K वर लक्ष ठेवले जात असल्याची पुष्टी केली आहे.4 / 11E482Q चे टेंशन घेण्याची आवश्यकता नाही - तज्ज्ञ - गेल्या आठवड्यात एका मुलाखतीत अग्रवाल म्हणाले होते, B.1.617.1 मध्ये E482Q म्यूटेशन न्यूट्रलायझेशन रिडक्शनसाठी महत्वाचा होता. P681R सेल इन्फ्यूजन वाढवायला मदत करतो. मात्र, B.1.617.2 सब-लिनिएजमध्ये कुठलेही E4842Q म्यूटेशन नाही. तरीही हा पसरत आहे. याचा अर्थ, E482Q चिंताजनक नाही. 5 / 11एक नवा म्यूटेशन T478K निश्चितपणे आहे. मात्र, त्याच्यासंदर्भात अद्याप सर्व काही माहिती मिळालेली नाही. जोवर त्यासंदर्भात माहिती मिळत नाही. तोवर आपण असे P681R मुळे होत आहे, की T478K मुळे होत आहे, हे सांगू शकत नाही, असेही अग्रवाल म्हणाले होते.6 / 11अग्रवाल यांनी केम्ब्रिज यूनिव्हर्सिटीचे रवींद्र गुप्ता यांच्या सोबतीने B.1.617 च्या अँटीबॉडीजसाठीच्या रिस्पांसवर एक संशोधन केले होते. त्यातही T478K चा उल्लेख आहे. गुप्ता यांनी गेल्या आठवड्यात ट्विट केले होते, की ते ब्रेकथ्रो इन्फेक्शंससाठी T487K म्यूटेशन्सला जबाबदार मानतात. इतर वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की या सब-टाइपच्या संक्रमणामागे स्पाइक प्रोटीनमध्ये T478K आणि L452R म्यूटेशन्सचे कॉम्बिनेशन आहे.7 / 11ऑक्टोबर 2020 नंतर याच म्यूटेशनचा सर्वाधिक प्रसार - स्टडी - युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगननेही आपल्या ताज्या अभ्यासात T478K संदर्भात लिहिले आहे, की कदाचीत यानेच मॅक्सिको व्हेरिएंट B.1.1.222ला 'सर्वाधिक संक्रामक' केले आहे. युनिव्हर्सिटीने 'अमेरिका, सिंगापूर, स्पेन, भारत आणि कोविड-19 चा अधिक फटका बसलेल्या देशांत लशींपासून वाचणाऱ्या आणि वेगाने पसरणाऱ्या म्यूटेशन्स'वर रिसर्च केला होता. या रिसर्चनुसार, व्हेरिएंटच्या सर्व म्यूटेशन्सपैकी, याचा ग्रोथ रेट ऑक्टोबर 2020 नंतर सर्वाधिक आहे.8 / 11अभ्यासात म्हणण्यात आले आहे, की ACE2 रिसेप्टर (मानवी) सेल्ससोबत याची हाय बाइंडिंग फ्री एनर्जी, असा इशारा करते, की T478K म्यूटेशन SARS-CoV-2 ला अधिक संक्रामक आणि घातक बनवू शकते. मात्र, रिसर्चनुसार, T478K अँटीबॉडीजसाठी कोणतीही समस्या निर्माण करत नाही.9 / 11T478K वर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक - युनिव्हर्सिटी ऑफ बोलोनाच्या आणखी एका अभ्यासात 10 लाख जीनोमिक सिक्व्हेन्सेसची तपासणी करण्यात आली आहे. यात म्हणण्यात आले आहे, की 2021नंतर SARS-CoV-2च्या सिक्व्हेन्सेसमध्ये याचा प्रसार 'चिंताजनक' आहे. 10 / 11जर्नल ऑफ मेडिकल व्हायरलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्टडीनुसार, मॅक्सिकोशिवाय हा म्यूटेशन अमेरिका, जर्मनी, स्वीडन आणि स्वित्झरलंडमध्ये आढळून आला आहे. अभ्यासात म्हणण्यात आले आहे, की कोविड-19 ला चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी T478K अत्यंत महत्वाचा आहे.11 / 11इतर म्यूटेशनपेक्षा वेगळा कसा? - आतापर्यंत B.1.617 चे तीन वेगवेगळे सब-टाइप्स आढळले आहेत. B.1.617.1 (भारतातही दिसला. मात्र, आता कमी होत आहे.), B.1.617.2 आणि B.1.617.3. B.1.617.1 आणि B.1.617.3 मध्ये सर्वसाधारणपणे स्पाइक प्रोटीन म्यूटेशन्स- L452R, E484Q, D614G, P681R आहे. L452R, E484Q आणि P681R म्यूटेशन्स व्हायरस पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करते, तर P681R म्यूटेशन फ्फुफुसातील संक्रमित पेशींच्या फ्यूजिंगसाठी जबाबदार असल्याचे म्हटले जाते. यामुळे आजार आणखी गंभीर रूप धारण करतो. मात्र, B.1.167.2 अनोखा आहे. कारण यात E484Q नाही आणि T478K म्यूटेशन दिसत आहे.