CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये जास्तीच्या भाज्या, फळांसह इतर पदार्थ खराब होऊ नये म्हणून 'ही' पद्धत वापरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 11:49 IST
1 / 10सध्या कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून जास्तीत जास्त लोकांचा बचाव करता यावा यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक लोक फळ, भाज्या अन्न- धान्य जास्तीत आणून ठेवत आहेत.2 / 10पण सध्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे भाज्या जास्त वेळ टिकून राहत नाहीत. लगेच खराब होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही भाज्या जास्त वेळ टिकवून ठेवू शकता. 3 / 10टॉमॅटो सगळ्यात लवकर खराब होतो. साधारणपणे आपण अनेक दिवस ठेवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवत असतो. टॉमॅटो जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी स्लाईजमध्ये कापून बेक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल घालून फ्रिजमध्ये ठेवा.4 / 10हिरव्या भाज्या साठवून ठेवण्यासाठी टिश्यूपेपरमध्ये रोल करून भाज्या फ्रिजमध्ये ठेवा किंवा प्लास्टिकमध्ये कव्हर करून ठेवा.5 / 10कांदा लसूण अशा पदार्थांना सुर्यप्रकाशापासून लांब ठेवा. त्यामुळे कांदा किंवा लसणाला कोंब येणार नाही आणि ते दीर्घकाळपर्यंत टिकून राहतील.6 / 10फळं ठेवण्यासाठी आधी धुवून घ्या. त्यानंतर पुरेशी हवा असलेल्या ठिकाणी ठेवा. नाहितर फळं किंवा बटाटा यांसारखे पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. 7 / 10केळी टिकवून ठेवणं खूप कठीण काम असतं. कारण केळ्यावर काळे डाग पडतात. त्यामुळे १ ते २ दिवसात खराब होत. यासाठी केळ्यांच्या पुढच्या बाजूला म्हणजे वरच्या आडव्या भागाला प्लास्किटने बंद करा.8 / 10दूध किंवा दही जास्त घरात साठवून ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही दुधाला पर्याय म्हणून दूधपावडर सुद्धा आणू ठेवू शकता.9 / 10कडधान्यांच्या ऊसळींचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. त्यासाठी किराणामालाच्या दुकानात मिळणारे सुके कडधान्य आणि डाळी तुम्ही साठवून ठेवू शकता. त्यासाठी हवाबंद डब्ब्यात धान्य टिकवून ठेवण्याची पावडर लावून तुम्ही साठवून ठेवू शकता.10 / 10गाजर तुम्हाला आणून ठेवायचे असतील तर एल्युमिनियमच्या फॉईल पेपरमध्ये रॅप करून फ्रिजमध्ये ठेवू शकता.