चिंताजनक! कोरोना व्हायरसची झाली होती लागण, पण 'इतक्या' लोकांमध्ये आढळल्याच नाहीत काही अॅंटीबॉडीज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 16:13 IST
1 / 10कोरोना व्हायरसबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या काही रूग्णांच्या शरीरात अॅंटी-बॉडीजच आढळून आले नाहीत. 2 / 10ब्रिटनच्या लंडन युनिव्हर्सिटी, सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटी हॉस्पिटल एनएचएस फांउडेशन आणि लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रापिकल मेडिसिनच्या एक्सपर्ट्सी केलेल्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. 3 / 10आता हा रिसर्च समोर आल्यानंतर आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढू शकते. कारण त्यांना हे समजून घेण्यास अडचण होईल की, कोणकोणते लोक कोरोनापासून बरे झालेले आहेत. 4 / 10या रिसर्चसाठी अभ्यासकांनी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 177 लोकांच्या टेस्टच्या रिझल्टचं विश्लेषण केलं. 5 / 10news.sky.com च्या रिपोर्टनुसार, अभ्यासकांना असं आढळून आलं की, 2 ते 8.5 टक्के रूग्णांमध्ये कोरोना अॅंटी-बॉडीज डेव्हलप झालेल्या नाहीत. 6 / 10हा रिसर्च अजून प्रकाशित झालेला नाही आणि ना दुसऱ्या तज्ज्ञांनी या रिसर्चची समीक्षा केली. रिसर्चमधून असेही समोर आले आहे की, ज्या रूग्णांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज डेव्हलप झाल्यात त्यांच्यात साधारण दोन महिने अॅंटी-बॉडीज समानरूपाने उपस्थित होत्या. अभ्यासकांनी सांगितले की, शक्यता आहे की, अशा लोकांमध्ये 2 महिन्यांनंतरही अॅंटी-बॉडीज राहतील.7 / 10तज्ज्ञ सांगतात की, 2 ते 8.5 टक्के रूग्णांमध्ये कोरोना अॅंटी-बॉडीज डेव्हलप न होण्यामागचं कारण हे असू शकतं की, त्यांच्या इम्यून सिस्टीमचा रिस्पॉन्स वेगळ्या प्रकारचा राहिला असेल. 8 / 10रिसर्चमधून समोर आले की, कोरोनाने गंभीर रूपाने आजारी झालेल्या रूग्णांमध्ये अॅंटीबॉडीज डेव्हलप होण्याची शक्यता अधिक असते. 9 / 10या रिसर्चनंतरही जगभरातील तज्ज्ञ अजूनही या निष्कर्षापर्यंत पोहोचले नाही की, सामान्यपणे कोरोनाने आजारी झाल्यावर इम्युनिटीची लेव्हल किती असते आणि किती काळासाठी राहते.10 / 10दरम्यान गेल्या महिन्यात ब्रिटन सरकारने घोषणा केली होती की, ते एक कोटी अॅंटीबॉडी टेस्ट किट मागवत आहेत. सरकारने सांगितले होते की, अॅंटीबॉडी टेस्टने हे कळेल की, किती लोक कोरोना व्हायरसने इम्यून झाले आहेत.