शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठा दिलासा! WHO ने च सांगितलं; कोणत्या देशाला कधी आणि किती लसी मिळणार

By manali.bagul | Published: September 22, 2020 4:16 PM

1 / 9
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना लस वितरणाच्या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. वेगवेगळ्या देशांना कोरोनाची लस देण्यासाठी WHO नं कोवॅक्स ही लस लॉन्च केली आहे. कोवॅक्सच्या माध्यामातूनच लसीचे वितरण होणार आहे.
2 / 9
आतापर्यंत जगभरातील १५० देशांसह कोवॅक्ससंबंधी भागिदारी करण्यात आली आहे. WHO नं इतर श्रीमंत देशांनाही कोवॅक्सच्या या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
3 / 9
लस शोधण्यापासून उत्पादन, वितरण या उद्देशानं कोवॅक्सची योजना तयार करण्यात आली आहे. याअंतर्गंत गरीब, श्रीमंत देश एकत्र पैसे जमा करून लस खरेदी करणार आहेत. यात समावेश असलेल्या हाई रिस्क कॅटेगरीतील लोकांना सगळ्यात आधी लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
4 / 9
आतापर्यंत ६४ श्रीमंत देशांनी कोवॅक्स या योजनेत भाग घेतला आहे. अमेरिकेनं कोवॅक्समध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. चीन आणि रशियासुद्धा यात सहभागी नाही. जर्मनी आणि ब्रिटन हे देश यात सहभागी आहेत.
5 / 9
येत्या काळात २४ देश या योजनेत सहभागी होतील असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांना आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एडवांस कमिटमेंटच्या माध्यमातून भारतानंही सहभाग घेतला आहे.
6 / 9
सुरक्षित आणि प्रभावी कोरोनाची लस मिळाल्यानंतर कॉवॅक्सच्या अंतर्गत असलेल्या सगळ्याच देशांना ही लस मिळू शकेल. यासाठी WHO नं दोन टप्प्यातील प्लॅन तयार केला आहे.
7 / 9
पहिल्या टप्प्यात सदस्य देशाच्या लोकसंख्येपैकी ३ टक्के लोकसंख्येला लसीचे डोस दिले जातील. त्यानंतर हे प्रमाण २० टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे.
8 / 9
लोकसंख्येच्या २० टक्के लोकांना लसीचा पुरवठा केल्यानंतरही वितरण पुरेसं नसल्यास फेज २ प्रोग्रामची सुरूवात होणार आहे. या अंतर्गत ज्या देशांमध्ये जास्त धोका आहे. त्या देशाला लसीचे डोस जास्त प्रमाणात पुरवले जातील. किती आणि कोणत्या लोकांना सगळ्यात आधी लस दिली जावी याचा निर्णय प्रत्येक देशानं घ्यायचा आहे.
9 / 9
तरीही आरोग्य सेवेतील कर्मचारी, गंभीर आजारांनी पिडीत असलेले आणि वयस्कर लोक यांना सगळ्यात आधी लस देण्यात येणार आहे.
टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या