1 / 11कोरोना महामारीबाबत दोन दिवसांआधी केसेसमध्ये थोडी घट बघायला मिळत होती. मात्र, आता पुन्हा एकदा वेगाने रूग्ण वाढत आहेत. गेल्या २४ तासात देशात ४ लाख लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत. तेच आरोग्य मंत्रालयाने आता स्पष्ट जाहीर केलं की, देशात कोरोना व्हायरसची तिसरी लाट येणारच. दुसरीकडे वॅक्सीनेशन वेगाने सुरू आहे. पण म्यूटेशननंतर कोविडचे नवे व्हेरिएंट येत आहेत. जे फार घातक सांगितले जात आहेत.2 / 11व्हायरसच्या थैमानाला १ वर्ष झालं असलं तरी लोकांच्या मनात अजूनही कोरोना व्हायरसबाबत अनेक प्रश्न आहेत. जसे की, सर्वांना माहीत आहे कोविड एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरतो. याचप्रमाणे याचं ट्रान्समिशन चालू राहते. या दिवसात अनेक लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे की, दुसऱ्या लाटेतील व्हायरस संक्रमित व्यक्तीद्वारे किती दिवसांनंतर दुसऱ्या व्यक्तीत पोहोचत नाही. 3 / 11कोरोनासंबंधी एका वेबीनारमध्ये गुरूगामचे डॉक्टर विनीत चड्डा यांनी सांगितले की, कोविड-१९ ने संक्रमित झाल्यानंतर रूग्ण १० दिवसांनंतर दुसऱ्याला संक्रमित करत नाही. हेच कारण आहे की, हेल्थ एक्सपर्ट कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देतात.4 / 11क्वारंटाइन कालावधी दरम्यान जर कुणाला सतत ३-४ दिवस ताप किंवा दुसरी लक्षणे दिसत नसतील तर संक्रमित व्यक्ती फीट आहे. त्याला निगेटिव्ह सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. 5 / 11सोप्या भाषेत सांगायचं तर जर कोविड संक्रमणाचे शिकार झाल्यावर त्यांच्यात कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नसतील तर याचा अर्थ होतो की, ती व्यक्ती महामारीतून रिकव्हर झाली आहे. 6 / 11डॉक्टरांनी सांगितलेल्या या गोष्टीवर सरकारकडून प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो म्हणजे PIB ने एक ट्विट करून दुजोरा दिला आहे. PIB ने पोस्टमध्ये लिहिले की, 'सामान्यपणे लक्षणे दिसल्यावर दहा दिवसांनंतर रूग्ण गैर संक्रामक होतो'.7 / 11म्हणजे जर कोरोना संक्रमित रूग्णाला गेल्या काही दिवसांपासून कोणतंही लक्षण नसेल आणि तापही नसेल, तर होम आयसोलेशननंतर त्याला निगेटिव्ह RT-PCR टेस्ट पुन्हा करण्याची गरज नाही. 8 / 11एका रिसर्चनुसार, व्हायरसच्या संपर्कात आल्यावर १० ते १४ दिवसांच्या आतच रूग्णात व्हायरसची लक्षणे विकसित होतात. रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, कोरोना संक्रमित रूग्ण ९ दिवसांपर्यंत दुसऱ्यांमध्ये व्हायरस संक्रमण पोहोचवत नाही. कोरोना व्हायरसबाबत ब्रिटनमध्ये कऱण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, कोरोनाचा रूग्ण ९ दिवसांनंतर दुसऱ्यांना संक्रमित करत नाही. 9 / 11या रिसर्चनुसार, कोविड संक्रमित व्यक्तीमधील व्हायरसची ९ दिवसानंतर संक्रमण पसरवण्याची क्षमता ९ दिवसात नष्ट होते. तेच सिंगापूर येथील राष्ट्रीय संक्रामक रोग केंद्राने आपल्या रिसर्चमध्ये हा दावा केला की, रूग्ण १० दिवसांनंतर संक्रमणातून मुक्त होतो. 10 / 11वैज्ञानिकांचं मत आहे की, कोरोना संक्रमित रूग्णाला सुरूवातीच्या दिवसात आयसोलेट करणं फार आवश्यक आहे. कारण लक्षणे नसलेले रूग्ण सुरूवातीलाच जास्त संक्रमण पसरवतात. 11 / 11यात इम्यूनिटीची महत्वाची भूमिका आहे. ज्या लोकांची इम्यूनिटी मजबूत आहे. ते या व्हायरसला १० दिवसांच्या आतच मारतात. याने संक्रमित होणाऱ्या व्यक्ती सर्वात जास्त समस्या फुप्फुसांमध्ये होते. ज्यामुळे रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.