शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाकाळात झोपेचं खोबरं झालंय? तज्ज्ञांनी सांगितले 'बेडरुम'मधील उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 12:20 IST

1 / 10
जर तुम्हाला अंथरुणावर झोप येत नसेल, सळमळत असाल तर असे होणारे तुम्ही एकटे नाही आहात. कोरोना महामारीने लोकांचे आयुष्यच बदलून टाकले आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांची तनाव आणि भीतीमुळे झोपच उडाली आहे. तज्ज्ञांनुसार आपण आता 'कोरोनासोम्निया' मधून जात आहोत. यामुळे आपली झोप प्रभावित झाली आहे. (How to get calm sleep at night.)
2 / 10
गेल्या वर्षी अमेरिकन अॅकाडमी ऑफ स्लीप मेडिसिनने हजारो लोकांचा एक सर्व्हे केला होता. तेव्हा केवळ 20 टक्के लोकच झोप न येण्याच्या त्रासापासून त्रस्त होते. मात्र, 10 महिन्यांनी जेव्हा पुन्हा सर्व्हे करण्याता आला तेव्हा झोप उडवणारी आकडेवारी समोर आली.
3 / 10
तब्बल झोप न येण्याचा त्रास असलेल्यांची संख्या 60 टक्क्यांवर जाऊन पोहोचली. यापैकी निम्म्या लोकांनी आपल्या झोपेची गुणवत्ता घसरल्याचे सांगितले. सध्या संक्रमण कमी झाले असले तरी कोरोनाच्या सुरुवातीच्या तुलनेत आता खूप भीती वाटत राहत, असे त्यांनी सांगितले.
4 / 10
तज्ज्ञांनुसार झोप उडण्यावर एक प्रभावी उपाय आहे. याचे नाव कॉग्निटिव बिहेवियर थेरिपी (सीबीटी) असे नाव आहे. याद्वारे तुमची झोप उडविणारे विचार, चिंता भावना आणि वागणुकीला नियंत्रित केले जाते. याद्वारे तुम्ही तुमची झोप सुधारू शकता.
5 / 10
जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यासाठी जाल तेव्हा 25 मिनिटांपर्यंत झोप आली नाही किंवा झोप मोड झाली तर पुन्हा झोपू नका. अंथरुणातून उठा. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे न्यूरोसायन्स विशेषज्ज्ञ डॉ. मैथ्यू वॉल्कर यांच्यानुसार लगेचच उभे राहून काही ना काही हालचाली करण्यास सुरुवात करावी, ज्याने तुमचे डोके शांत आणि थकलेले वाटायला लागेल.
6 / 10
यामध्ये स्ट्रेचिंग, ध्यान, प्राणायामसह गाणी ऐकण्याचे किंवा पुस्तक वाचण्याचे काम करू शकता. जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटू लागेल तेव्हा बेडवर जावे.
7 / 10
जर तुम्ही अधिक चिंतातूर राहत असाल तर झोपण्याआधी एका कागद आणि पेन घ्या. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे, कोणाशी बोलणार आहात, कुठे जाणार किंवा ज्या गोष्टी तुम्हाला सतावत असतील त्या लिहून काढा. यानंतर काही वेळाने तो कागद गुंडाळून फेकून द्या. स्लीप मेडिसिन डॉक्टर इलीन एम रोसेन यांच्यानुसार चिंतेपासून मुक्ती मिळण्यास मुदत मिळेल.
8 / 10
आपला अधिकांश वेळ हा स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरमध्ये जात आहे. अथरुणावर पडल्यानंतरही याचा वापर केला जात आहे. झोपताना या फोनमधून निघणारे निळा प्रकाश डोळा आणि मेंदूसाठी योग्य नाही. आजपासूनच हा नियम लावा की, अंथरुणात मोबाईल नाही.
9 / 10
जाग आल्यानंतर सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्याचे अनेक फायदे आहेत. मोठा फायदा म्हणजे यामुळे झोप वाढविणारे हार्मोन मेलाटोनिनचा स्त्राव वाढतो. यामुळे कमीतकमी 15 मिनिटे तरी सूर्यप्रकाशात या.
10 / 10
महामारीमध्ये वर्क फ्रॉम होममुळे लोक घरातूनच काम करत आहेत. यासाठी बेडरुमचाही वापर केला जात आहे. बेडवर दिवसभर बसल्याने रात्री मानसिक शांतता मिळणे कमी झाले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या