शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! कोरोना होतोय जीवघेणा, फुफ्फुसासह 'या' 6 अवयवांवर करतोय अटॅक; 'ही' आहेत 25 लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 3:58 PM

1 / 14
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,518 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 14
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,701 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा वेग वाढला असून दहा राज्यांतील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 45 टक्क्यांची वाढ झाली आहे.
3 / 14
केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच दरम्यान कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती सातत्याने समोर येत आहे. कोरोना आता आणखी घातक होत आहे.
4 / 14
कोरोनाच्या रूग्णांमध्ये ज्या प्रकारची लक्षणे दिसतात ते पाहता हा फक्त श्वसनाचा आजार नाही असं नक्कीच म्हणता येईल. त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवरही होतो. फुफ्फुसांसह कोरोना सहा अवयवांवर अटॅक करत आहे.
5 / 14
व्हायरस फक्त फुफ्फुसांनाच नाही तर हृदय, मेंदू, किडनी, पोट आणि आतडे यांनाही मोठं नुकसान पोहोचवत आहे. यामुळेच शरीराच्या कोणत्याही भागाशी संबंधित लक्षणे हलक्यात न घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी आता दिला आहे.
6 / 14
एका रिसर्चनुसार, 50% पेक्षा जास्त कोरोना संक्रमित लोकांमध्ये किमान एक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षण दिसून येते. अतिसार हे एक अतिशय सामान्य पचन लक्षण आहे. ओटीपोटात दुखणे, मळमळ आणि उलट्या इतर कोणत्याही कारणाशिवाय अचानक होऊ शकतात.
7 / 14
कोरोना व्हायरसमुळे एक्यूट कोरोनरी सिंड्रोम, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, मायोकार्डिटिस आणि एरिथमिया होऊ शकतो. महामारीपासून अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यांना आधीच हृदयाची समस्या आहे त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
8 / 14
घाम येणे, धाप लागणे, हृदयाचे अनियमित ठोके आणि हात, मान आणि जबड्याला त्रास होणं ही हृदयविकाराची सामान्य लक्षणे आहेत. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज असून तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
9 / 14
कोरोना पहिल्यापासून फुफ्फुसांवर हल्ला करत आहे. हा श्वसनमार्गाद्वारे मानवी शरीरास संक्रमित करतो, म्हणून फुफ्फुसांचे नुकसान होतं. यामुळे, फुफ्फुसांमध्ये भरपूर कचरा आणि द्रव जमा होतो.
10 / 14
कोरोनाचा फुफ्फुसाला सर्वाधिक फटका बसतो. यामुळे जळजळ होतं. जास्त थुंकी निर्माण होते, खोकला, छातीत दुखणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं ही त्याची सामान्य लक्षणे असल्याचं समोर आलं आहे.
11 / 14
कोरोनाग्रस्त लोकांमध्ये किडनी निकामी होण्याची लक्षणे दिसू शकतात. रिसर्चनुसार, कोरोनाने ग्रस्त असलेल्या 30% पेक्षा जास्त रुग्णांना नंतर किडनीचा त्रास जाणवला. किडनीमध्ये रिसेप्टर पेशी असतात ज्यामुळे शरीरात कोरोना व्हायरसचा प्रवेश करतो.
12 / 14
न्यूमोनियामुळे होणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी असामान्यपणे कमी झाल्यामुळे कोरोनाचा किडनीवर परिणाम होतो. कोरोनामुळे किडनी खराब होण्यामागची सामान्य लक्षणे म्हणजे अनियमित लघवी, पाय सुजणे, डोळ्याभोवती सूज येणे, श्वासोच्छवासाचा त्रास, थकवा, आणि कोमा.
13 / 14
बर्‍याच प्रकरणांमध्ये, रुग्णांच्या स्पाइनल फ्लुइड आणि मेंदूच्या पेशींमध्ये कोरोना दिसून आला आहे. कोरोना व्हायरस रिसेप्टर पेशी सेरेब्रल कॉर्टेक्स आणि ब्रेनस्टेममध्ये असतात, ज्याद्वारे व्हायरस प्रवेश करतो.
14 / 14
कोरोनामध्ये तयार झालेल्या गुठळ्या मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित करू शकतात, ज्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो. मेंदूच्या समस्यांशी संबंधित कोरोनाची सामान्य लक्षणे म्हणजे चक्कर येणे, वास न येणं आणि चव कमी होणं, डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य