अॅसिडिटीमुळे आहात हैराण?;7 पदार्थ आहारातून करा कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 12:07 IST
1 / 8पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटाचा आस्वाद घेणे, सर्वांनाच आवडते. पण पचण्यास जड असलेल्या पदार्थांमुळे आपणास बऱ्याचदा पचनक्रियेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. गॅसेसचा त्रास, आंबट ढेकर, अपचन, छाती-पोटामध्ये जळजळ आणि अॅसिडिटीचा त्रास सहन करावा लागतो. काही पदार्थांच्या गुणधर्मांमुळेच अॅसिडिटीचा त्रास होतो. या पदार्थांचे पचन लवकर होत नाही. पदार्थ न पचल्यामुळे शरीरात आम्ल तयार होते. जर तुम्हाला वारंवार अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर याचे मूळ शोधणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त पचनास हलके असलेले खाद्यपदार्थांचं सेवन करावे. जेणेकरुन शरीरातील अॅसिडिटी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. अॅसिडिटीचा त्रास होऊ नये, यासाठी काही पदार्थ वर्ज्य करावेत2 / 81. चॉकलेट - खूपच कमी जण अशी असतील ज्यांना चॉकलेट्स आवडत नसतील. चॉकलेट चवीला जरी गोड असेल तरी शरीरावर होणारे त्याचे परिणाम प्रचंड वाईट आहे. चॉकलेटचे सेवन आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. ज्यांना अॅसिडिटीची समस्या आहे, त्यांनी चॉकलेट खाणं पूर्णतः बंद करावे. कारण चॉकलेटमध्ये कॅफीन आणि थियोब्रोमाइनसारख्या पदार्थांचा समावेश असतो. यामुळे अॅसिडिटी वाढते. यामध्ये कोको आणि फॅट्सही अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे चॉकलेट खाणं बंद केल्यास तुम्हालाच फायदा होईल.3 / 82. सोडा - शरीरात अॅसिड निर्माण होण्यासाठी सोडा आणि अन्य कार्बोनेटेड पेयदेखील जबाबदार आहेत. कार्बोनेशनचे बुडबुडे पोटामध्ये गेल्यानंतर वाढत्या दबावामुळे जळजळ होण्याचा त्रास होऊ लागतो. शिवाय, यामध्ये कॅफीनचेही प्रमाण अधिक असते. 4 / 83. दारू - बियर आणि वाइनसारख्या मादक पेयांमुळे केवळ पोटातील गॅसच वाढत नाही तर शरीर डिहायड्रेटही होते. यामुळे मोठ्या प्रमाणात अॅसिडिटी वाढते. महत्त्वाचे म्हणजे जरी तुम्ही दारूचे सेवन करत असाल तर सोड्यासारखे कार्बोनेटेड पेयासहीत त्याचे सेवन करू नका. 5 / 84. कॉफी/चहा - दिवसातून केवळ एक किंवा दोन कप कॉफी किंवा चहा पिणं योग्य आहे. पण, याहून अधिक वेळा जर तुम्ही चहा किंवा कॉफीचे सेवन करत असाल तर वेळीच धोका ओळखा. तुम्हाला अॅसिडिटीचा प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो. कारण, कॉफी/चहामध्ये भरपूर प्रमाणात कॅफीनचे प्रमाण असते. कॅफीनमुळे पोटात गॅस्ट्रिक अॅसिडचा स्त्राव होतो,यामुळे अॅसिडिटी होते. महत्त्वाचे म्हणजे रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये. 6 / 85. मसालेदार पदार्थ - मसालेदार पदार्थांच्या अधिक सेवनामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मिरची, गरम मसाले आणि काळी मिरची हे पदार्थ नैसर्गिकरित्या अॅसिडिक असतात. या पदार्थांमुळे शरीरात अॅसिड तयार होऊ लागते. जे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे तिखट पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात आणि मर्यादेतच करावेत.7 / 86. चरबीयुक्त पदार्थ - चरबीयुक्त पदार्थांमध्ये (फॅट्स) आम्लाचे प्रमाण भरपूर असते. चरबीयुक्त पदार्थ दीर्घ काळापर्यंत पोटात तसेच राहतात. यामुळे शरीरातील आम्ल वाढते. तळलेले पदार्थ, मांसाहारी पदार्थ पचनास जड असतात. अॅसिडिटी होऊ नये, यासाठी मांसाहार वर्ज्य करावा आणि तळलेल्या पदार्थांऐवजी भाजलेले आणि उकडलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.8 / 87. आंबट फळे - आरोग्यासाठी फळे पोषक आणि आवश्यक असतात. रिकाम्या पोटी आंबट फळांचे सेवन केल्यास अॅसिडिटी वाढू शकते. संत्रे, लिंबू, टोमॅटो, जांभूळ यांसारख्या फळांमध्ये आम्ल भरपूर असते. यामुळे हृदयातही जळजळ होण्याचा त्रास होतो.