1 / 4विदर्भातला उन्हाळा दिवसागणिक तापत असला तरी, ज्यांना रोजची कामे उन्हातान्हात जाऊन करावीच लागतात, त्यांची व्यथा काय सांगावी? गोंदिया रेल्वेस्थानकावर सायकलरिक्शा चालवणारा सयेश लोकराम सावनकर म्हणतो, काम नाही केलं तर पोटाले भाकर कोन देईन? 2 / 4दिवसभर सायकलवर उन्हातान्हात फिरून ओमप्रकाश मरघडे विकतात थंडगार व स्वादिष्ट कुल्फी..3 / 4समोर ४४ डिग्री तर जवळ त्यातून अधिक तापमानात काम करणारा टेकचंद रिनायत. रणरणत्या उन्हात धगधगत्या स्टोव्हपुढे उभे राहून दिवसभर चहा बनवतो. 4 / 4 गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर बाबूराव बडगे, वय वर्षे ७२. डोक्यावर ओझे, खांद्यावर ओझे आणि उन्हाची काहिली.