शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टावरील एका पोस्टसाठी विराट कमवतो 82,48,000 ₹

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 17:03 IST

1 / 11
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी 82,48,000 रूपये मिळतात. इन्स्टाग्रामवर कोहलीचे 2 कोटी 25 लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामकडून सर्वाधिक कमाई करणा-या खेळाडूंमध्ये विराट नवव्या स्थानावर आहे. या क्रमवारीत 5 कोटी कमाईसह ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे. जाणून घेऊया या क्रमवारीतील अव्वल दहा खेळाडू...
2 / 11
इन्स्टावर एका पोस्टसाठी सर्वाधिक कमाई करणा-या खेळाडूंमध्ये पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे. 13.30 कोटी फॉलोअर्स असलेला रोनाल्डो एका पोस्टसाठी 5,15,58,750 रूपये कमवतो.
3 / 11
ब्राझिलचा अव्वल फुटबॉलपटू नेयमार हा या क्रमवारीत दुस-या स्थानावर आहे. त्याचे इन्स्टावर 10.10 कोटी फॉलोअर्स आहेत आणि त्याला एका पोस्टसाठी 4,12,53,000 रूपये मिळतात.
4 / 11
विश्वचषक स्पर्धेतील अपयशानंतरही अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. इन्स्टावर त्याचे 9.5 कोटी चाहते आहेत आणि त्यालाही एका पोस्टसाठी 3,43,77,500 रूपये मिळतात.
5 / 11
इंग्लंड फुटबॉल संघाचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमची लोकप्रियता अजूनही कायम आहे. जवळपास पाच कोटी चाहते त्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात आणि त्याला एका पोस्टसाठी 2,06,29,500 एवढी रक्कम मिळते.
6 / 11
वेल्स आणि रेयाल माद्रिद क्लबचा प्रमुख खेळाडू गॅरेथ बेलचा समावेश अनपेक्षित आहे. 3.49 कोटी फॉलोअर्स असलेल्या बेलला एका पोस्टसाठी 1,27,21,525 मिळतात.
7 / 11
स्वीडनचा निवृत्त फुटबॉलपटू झाल्टन इब्राहिमोव्हीच एका पोस्टसाठी 1 कोटी 20 लाख कमावतो. त्याचे 3.33 कोटी फॉलोअर्स आहेत.
8 / 11
विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणा-या उरूग्वेच्या संघातील प्रमुख खेळाडू लुइस सुआरेझ या क्रमवारीत 7व्या स्थानावर आहे. 2.84 कोटी फॉलोअर्स असलेला हा खेळाडू 1.03 कोटी एका पोस्टमागे कमावतो.
9 / 11
आयर्लंडचा मिक्स मार्शल आर्ट्सचा खेळाडू कॉनोर मॅकग्रेगोर आठव्या स्थानावर आहे. त्याला एका पोस्टसाठी जवळपास 86 लाख रूपये मिळतात.
10 / 11
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नवव्या स्थानावर असून त्याचे 2.25 कोटी फॉलोअर्स आहेत आणि त्याला एका पोस्टसाठी 82,48,000 रूपये मिळतात. विराटने या कमाईत जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू फ्लॉइड मेव्हेदरला मागे टाकले आहे. मेव्हेदर या क्रमवारीत 11व्या स्थानी आहे.
11 / 11
अमेरिकेचा बास्केटबॉल खेळाडू स्टीफन करी दहाव्या क्रमांकावर आहे. 2.09 कोटी फॉलोअर्स असलेला हा खेळाडू प्रति पोस्ट 75,68,550 रूपये कमावतो.
टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोVirat Kohliविराट कोहलीSportsक्रीडा