ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मुलगा येणार अडचणीत; 'त्या' व्हिडीओनंतर पोलीस करणार तपास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 16:47 IST
1 / 8जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा मुलगा ज्युनियर ख्रिस्तियानो अडचणीत येण्याची शक्यता आहे. 2 / 8रोनाल्डोची बहीण एल्मा हीनं रोनाल्डोच्या 10 वर्षीय मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 3 / 8त्यानंतर हा वाद निर्माण झाला. आता पोलीसांनी तपासाची तयारी दर्शवली आहे. 4 / 8एल्मा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत रोनाल्डोचा मुलगा जेट स्की चालवताना दिसत होता. 5 / 8नियमानुसार लहान मुलगा जेट स्की चालवू शकत नाही, त्यामुळे आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एल्मानं तो व्हिडीओ डिलीट केला. 6 / 8शनिवारी रोनाल्डोचा मुलगा काही नातेवाईकांसह फिरायला गेला होता. तेव्हा त्यानं जेट स्की चालवली. 7 / 8पोलीस प्रमुख गौरेईरो कार्डोसो यांनी तपास सुरू असल्याची माहिती दिली. रोनाल्डोच्या मुलाला 25 हजार ते 2.54 लाखांचा दंड भरावा लागू शकतो. 8 / 8शिवाय त्या खासगी फर्म किंवा ग्रुपला 10 लाखांचा दंड भरावा लागू शकतो, असेही पोलिसांनी सांगितले.