शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्राझील जिंकण्यासाठी मॉडेलचा 'बोल्ड' निर्णय, प्रत्येक गोलवर शेअर करणार टॉपलेस फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 16:36 IST

1 / 5
फिफा विश्वचषक 2022 ची प्री क्वार्टरफायनल फेरी सुरू होणार आहे. फॅन्स आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. दरम्यान, ब्राझीलच्या एका मॉडेलने एक मोठी घोषणा केली आहे, जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
2 / 5
ब्राझीलची मॉडेल डियान टोमाझोनीने ब्राझीलच्या फॅन्सना वचन दिले आहे की, जेव्हाही ब्राझील टीम गोल करेल तेव्हा ती तिच्या इंस्टाग्रामवर टॉपलेस फोटो शेअर करेल. तिच्या या घोषणेनंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र, हे केवळ तिच्या सेक्यूर फॉलोअर ग्रुपसाठी असणार आहे.
3 / 5
24 वर्षांच्या टोमाझोनीचे हजारो फॉलोअर्स आहेत. ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बोल्ड फोटो शेअर करत असते आणि त्यामुळेच ती चर्चेत राहते. आपली टीम विश्वचषक जिंकेल असा टोमाझोनीला विश्वास आहे.
4 / 5
टोमाझोनीने सांगितले की, तिने ब्राझीलच्या शेवटच्या सामन्यातही असेच केले होते. त्यानंतर ब्राझीलने स्वित्झर्लंडचा 1-0 असा पराभव केला आणि तिने टॉपलेस फोटो शेअर केला.
5 / 5
ब्राझील संघाने आपल्या ग्रुप फेरीतील पहिले दोन सामने जिंकून नॉकआउट फेरी गाठली आहे. ब्राझीलने पहिल्यांदा सर्बियाचा 2-0 असा पराभव केला आणि नंतर स्वित्झर्लंडचा 1-0 असा पराभव केला. आता ब्राझीलचा सामना 3 डिसेंबरला कॅमेरूनशी होणार आहे.
टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Brazilब्राझीलFootballफुटबॉल