FIFA U-17 World Cup : पराभवानंतरही भारतीय संघाने उपस्थितांची मने जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 00:16 IST
1 / 5नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये १७ व्या फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जाणा-या अमेरिकेकडून भारतीय संघाला 3-0 गोलने पराभव पत्करावा लागला.2 / 5अमेरिकेकडून कर्णधार जोश सार्जेंटने पेनल्टीवर ३१ व्या मिनिटाला, ख्रिस डॉर्किनने ५२ व्या आणि अँड्र्यू कार्लटन याने ८४ मिनिटाला गोल केले.3 / 5भारतीय खेळाडूदेखील आपल्या पालक आणि प्रेक्षकांसमोर सर्वोत्तम कामगिरी करू इच्छित होते. त्यात गोलरक्षक धीरज मोईरांगथेम याच्याशिवाय कोमल थाटल आणि सुरेश वांगजाम व फॉरवर्ड अनिकेत जाधव यांची कामगिरी प्रशंसनीय ठरली.4 / 5पराभवानंतरही भारतीय संघाने आपल्या प्रेरणादायी कामगिरीने उपस्थितांची मने जिंकली. त्याचप्रमाणे फिफा स्पर्धेत सहभागी होणारा पहिला भारतीय संघही बनवत इतिहास रचला. 5 / 5हा सामना पाहण्याठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष हजेरी लावली होती. त्यांच्यासोबत एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, क्रीडामंत्री राजवर्धन सिंह राठोड सह अनेक दिग्गज व्यक्ती आणि खेळाडूंची उपस्थिती होती.