कोण आहे Georgina Rodríguez?, एकेकाळची सेल्स असिस्टन्स अन् आज Cristiano Ronaldoनं दिलं तिला भारी गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 17:19 IST
1 / 10जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर मॉडेल जॉर्जिन रॉड्रीग्जच्या वाढदिवसाचे पोस्टर्स झळकले अन् सगळीकडे तिची चर्चा रंगली. स्पेनच्या जाका शहरातील जॉर्जिना रॉड्रीग्जचा जन्म. जॉर्जिनाची आई स्पेनची आहे, तर वडील अर्जेंटिनाचे. 2 / 10लंडनमध्ये शिक्षण घेणाऱ्या जॉर्जिना मॉडलिंग क्षेत्रात येण्यापूर्वी डान्स शिकायची. जॉर्जिनाच्या वडिलांना अमली पदार्थच्या तस्करी प्रकरणी दहा वर्षांचा कारावास झाला होता. 3 / 10कधीकाळी जॉर्जिना ही माद्रिद येथे ज्युसी स्टोरमध्ये सेल्स असिस्टन्स म्हणून काम करायची.२०१६मध्ये तिची ओळख जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोशी झाली. 4 / 10जॉर्जिना ज्या स्टोरमध्ये काम करत होती तिथेच रोनाल्डोसोबत तिची नजरानजर झाली आणि पाहता क्षणीच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.5 / 10नोव्हेंबर 2016मध्ये पॅरीस येथील डिजनीलँड येथे रोनाल्डो व जॉर्जिना यांना प्रथम एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर हे कपल अनेकदा पब्लिक प्लेसमध्ये फिरताना दिसले. 6 / 10नोव्हेंबर 2017मध्ये जॉर्जिनानं सुंदर मुलीला जन्म दिला. रोनाल्डो अन् जॉर्जिना यांच्या मुलीचे नाव अॅलेना मार्टिना असे आहे. अॅलेना व्यतिरिक्त या रोनाल्डोची तीन मुलं आहेत..7 / 10गुरूवारी जॉर्जिनानं २८वा वाढदिवस साजरा केला. मँचेस्टर युनायटेडचा स्टार रोनाल्डो यानं तिला भारी गिफ्ट दिलं. रोनाल्डोनं जॉर्जिनाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा देताना तिचे फोटो बुर्ज खलिफावर झळकवले.8 / 10लवकरच जॉर्जिनाच्या आयुष्यावर आधारीत सीरिज नेटफ्लिक्सवर येणार आहे. रोनाल्डो कुटुंबीयांसह सध्या दुबईतच आहे.9 / 10लवकरच जॉर्जिनाच्या आयुष्यावर आधारीत सीरिज नेटफ्लिक्सवर येणार आहे. रोनाल्डो कुटुंबीयांसह सध्या दुबईतच आहे.10 / 10लवकरच जॉर्जिनाच्या आयुष्यावर आधारीत सीरिज नेटफ्लिक्सवर येणार आहे. रोनाल्डो कुटुंबीयांसह सध्या दुबईतच आहे.