माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
1 / 5हॅन्ड ब्लेंडर : हॅन्ड ब्लेंडर किचनसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. जर तुमची काहीच तयार करायची इच्छा नसेल तर तुम्ही झटपट एक हेल्दी शेक तयार करू शकता. याव्यतिरिक्त कोणताही पदार्थ तयार करण्यासाठी हे ब्लेंडर उपयोगी पडतं. टॉमेटोची प्युरी, लसूणही यामध्ये ब्लेंड करू शकता. 2 / 5इलेक्ट्रिक केटल : इलेक्ट्रिक केटलमध्ये चहा, दूध उकळण्याव्यतिरिक्त तुम्ही अंडी उकडून खाऊ शकता किंवा मॅगी तयार करू शकता. 3 / 5इलेक्ट्रिक राइस कुकर : इलेक्ट्रिक राइस कुकरही अत्यंत उपयोगी पडणारं उपकरण आहे. यामध्ये तुम्ही अत्यंत कमी वेळामध्ये भात, बिर्याणी, सूप, दलिया यांसारखे पदार्थ तयार करू शकता. 4 / 5किचन टूल्स : स्वयंपाक करणं सोप व्हावं म्हणून काही किचन टूल्स असणं गरजेचं असतं. एक चांगला चाकू, छोटी कात्री, किसणी, स्टोरेज कंटेनर, प्लेट्स, चमचे यांसारख्या गोष्टी असणं गरजेचं असतं. 5 / 5फ्राइंग पॅन : फ्राइंग पॅनचा वापर करून तुम्ही गरजेचे सर्व पदार्थ, जसं मॅगी, फ्राइड राइस, भाजी यांसारखे अनेक पदार्थ तयार करू शकता.