शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

लसूण सोलण्यासाठी वापरा 'या' ५ ट्रीक; नखं न लावता झटपट लसूण सोलण्याचा सोपा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 14:50 IST

1 / 6
जेवणाची चव वाढवण्यासाठी भारतीय आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो. यात आलं, लसणाचाही समावेश आहे. पदार्थांला चव, तिखटपणा देण्यासाठी जवळपास सगळ्यांच्याच घरात वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. लसणात अनेक औषधी गुण सुद्धा आहेत.
2 / 6
लसूणाचा आहारात समावेश करणं ठीक आहे. पण लसूण सोलायचं म्हटलं की, खूप कंटाळा येतो. आज आम्ही तुम्हाला लसूण सोलण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत. या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही नखांचा वापर न करता झपटपट लसूण सोलू शकता.
3 / 6
हिवाळ्यात लसणाची चटणी आणि लोणचं अनेकांच्या घरी खातात. लसूण सोलण्याआधी एक तासभर पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर लसूण बाहेर काढून स्वच्छ कापडानं पूसून घ्या. त्यानंतर एका प्लास्टीकवर ठेवून हलक्या हाताने दाबा, असं केल्यानंतर आपोआप लसणाची साल निघायला सरूवात होईल.
4 / 6
याशिवाय लसूण लवकर सोलले जावेत यासाठी वरचा भाग काढून घ्या.यामुळे लसणाची साल सहज निघून जाईल. त्यानंतर तुम्ही बारिक कापू शकता.
5 / 6
लसूण लवकर सोलले जावेत यासाठी ३० सेकंद मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्यास उत्तम ठरेल. जेव्हा तुम्ही मायक्रोव्हेवमधून लसूण बाहेर काढाल. तेव्हा आपोआप साल निघायला सुरूवात होईल. याशिवाय तुम्ही कढई किंवा तव्यावर लसूण गरम करून घेऊ शकता. यामुळे लसणाची साल लगेच निघण्यास मदत होईल.
6 / 6
लसूण वेगवेगळे करून एका डब्यात भरा. त्यानंतर हा डबा, वर खाली चार ते पाच वेळा हलवा. असं केल्यानं डब्बा उघडताच लसणाची साल निघून जाण्यास मदत होईल.
टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स