शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाची धास्ती; हेल्मेट घालून खेळाडू करतोय कसरत, पाहा PHOTO!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 1:43 PM

1 / 8
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या व्हायरसपासून वाचण्यासाठी स्वतः स्वतःची काळजी घेणं, हे महत्त्वाचं पाऊल आहे.
2 / 8
कोरोना व्हायरसमुळे मागील तीन महिने क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता हळुहळू स्पर्धा सुरू होत आहेत. कोरोना व्हायरस संदर्भातील सर्व नियमांचं काटेकोर पालन करून या स्पर्धा खेळवण्याला परवानगी देण्यात आली आहे.
3 / 8
पण, कोरोनाच्या धास्तीनं एक खेळाडू चक्क हेल्मेट घालून कसरत करताना दिसला आहे. फॉर्म्युला वन शर्यतीतील चालक व्हॅल्टेरी बोट्टास हा चक्क हेल्मेट घालून कसरत करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
4 / 8
मर्सिडीज संघाचा 30 वर्षीय चालक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत सराव करत आहे. पण, त्याच्या डोक्यावर हेल्मेट पाहून सर्वांना आश्चर्य वाटत आहे. मेडिटेरानीन आयलंडवर तो सध्या टिफनी क्रोमवेलसोबत आहे.
5 / 8
फेब्रुवारी महिन्यात या दोघांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं. आता ही दोघं सोबत कसरत करताना दिसत आहेत. पण, बोट्टासनं त्याचा रेसिंग हेल्मेट घातला आहे.
6 / 8
येत्या रविवारी फॉर्म्युला वन शर्यतीला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रीया येथे ही शर्यत होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे 10 शर्यती रद्द झाल्या आहेत. ऑस्ट्रीयात दोन शर्यती होतील आणि त्यानंतर 19 जुलैला हंगेरियन ग्रां प्री स्पर्धा होईल.
7 / 8

8 / 8

टॅग्स :carकारcorona virusकोरोना वायरस बातम्या