1 / 11याप्रकरणी एसपी राजीव रंजन म्हणाले की, 'महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीला खाण्यातून बेशुद्ध होण्याचं औषध दिलं. त्यानंतर उशीने त्याचं तोंड दाबून त्याची हत्या केली होती. सोबतच मृतदेह गावाबाहेर फेकला होता. 2 / 11३० जानेवारीला बीरन बिगहा गावात एका व्यक्तीची हत्या झाली होती. मृतकाच्या भावाने अरूण सिंहने जमिनीचा सुरू असलेल्या आपल्या शेजाऱ्यालाच या हत्येत आरोपी मानलं होतं. मात्र, पोलिसांना घटनास्थळी काही वेगळे पुरावे मिळाले होते. 3 / 11पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला आणि आता ५ महिन्यांनंतर खऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकऱणी अटक करण्यावरून ५ मार्चला एसपी कार्यालयात चांगलाच गोंधळ झाला होता. इतकंच काय तर एसपीला बंधक बनवून अनेक तास हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. 4 / 11आरोपी राजमुनी देवीने एसपी कार्यालयात जाऊन पोलिसांसोबत भांडण केलं होतं आणि शेजारी व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली होती. यावरून तिने चांगलाच गोंधळ घातला होता. 5 / 11पोलिसांनी नंतर मोबाइल सर्व्हिलांसच्या आधारावर तपास सुरू केला तर मृत व्यक्तीच्या अनैतिक संबंधाचा खुलासा झाला. या खुलाशानंतर पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारावर मृतकाच्या पत्नीचे कॉल डिटेल्स काढले आणि तिचं मोबाइल लोकेशन ट्रेस केलं. यातून समोर आलं की, ज्या दिवश ही घटना घडली त्या दिवशी ती मृतकाच्या घरातच होती.6 / 11यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराची चौकशी केली होती. पण दोघेही पोलिसांना खोटं सांगत होते. अशात या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा आरोपी पत्नीने तिच्या प्रियकराला दगा देऊन पतीच्या चुलत भावासोबत लग्न केलं.7 / 11प्रेयसीने दगा दिल्याच्या रागातच तो पोलिसांसमोर आला आणि त्याने घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा दोघांना समोरासमोर आणून चौकशी केली. तेव्हा कुठे या घटनेचा पूर्ण खुलासा झाला.8 / 11आरोपी पत्नी म्हणाली की, 'तिच्या प्रियकराने बेशुद्ध होण्याचं औषध दिलं होतं. ते भाजीत टाकून तिने पतीला खाऊ घातलं. त्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि तोंड उशीने दाबून प्रियकर मोनूने पतीची हत्या केली. 9 / 11तेच महिलेचा प्रियकर म्हणाला की, दोघांमध्ये अनैतिक संबंध होते आणि दोघेही लग्न करणार होती. या लग्नात प्रेयसीचा पती आडकाठी ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग करून हे कृत्य केलं.10 / 11याप्रकरणी एसपी राजीव रंजन म्हणाले की, 'महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीला खाण्यातून बेशुद्ध होण्याचं औषध दिलं. त्यानंतर उशीने त्याचं तोंड दाबून त्याची हत्या केली होती. सोबतच मृतदेह गावाबाहेर फेकला होता. 11 / 11ते म्हणाले की, मृतकाच्या परिवाराने जमीन वादातून झालेल्या मारझोडीमुळे अनेक लोकांना या हत्येत आरोपी बनवलं होतं. मृताचे कुटुंबीय जमीन वादातून तुरूंगातही गेले होते. मात्र, पोलिसांनी तपास केल्यावर हत्येचे आरोपी वेगळेच निघाले.