मंदिरात विधवा महिलेवर गँगरेप झाल्याने खळबळ, उत्तर प्रदेशानंतर तामिळनाडूत घडली लज्जास्पद घटना
By पूनम अपराज | Updated: January 8, 2021 21:17 IST
1 / 5तामिळनाडूतील नागापट्टीणम येथे एका मंदिरात आलेल्या ४० वर्षीय विधवा महिलेला मारहाण करून तिच्यावर गँगरेप केल्याची कथित धक्कादायक घटना घडली आहे. 2 / 5मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन दोघांना अटक केली आहे. तर पीडितेच्या बहिणीने आणखी एक तक्रार पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 3 / 5कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचे म्हणत पीडित महिलेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.4 / 5पीडितेने दिलेल्या माहितीवरून आरोपी दारूच्या नशेत होते आणि त्यांनी मंदिरात फरफटत नेऊन मारहाण देखील केली. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दोन्ही आरोपींनी तिच्या बहिणीच्या घराकडे जाणाऱ्या विधवेचा पाठलाग केला आणि चाकूने धमकावत तिला मंदिरात खेचत नेले.5 / 5 त्यानंतर शुक्रवारी पहाटेपर्यंत दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तेथून पळ काढला. घटनेदरम्यान महिलेला अनेक ठिकाणी दुखापत झाली व ती बेशुद्ध पडली.