Shocking! सावत्र आई आणि सख्ख्या बापाने केली मुलीची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 12:40 IST
1 / 8बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात नात्यांना काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका सावत्र आई आणि सख्ख्या वडिलांनी आपल्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. भीमपुरा गावाच्या नाल्या शेजारी तरूणीचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.2 / 8तरूणीची हत्या करण्याचा आऱोप तरूणीच्या मामाने तिच्या सख्ख्या वडिलांवर आणि सावत्र आईवर लावला आहे. दोन दिवसांपूर्वीच तरूणीच्या मामाने तरूणीच्या वडिलांवर आणि सावत्र आई विरोधात हत्येचा संशय व्यक्त करत ती बेपत्ता असल्याचा तक्रार दाखल केली होती.3 / 8मृत तरूणीच्या मामाने सांगितलं की, मृत तरूणीच्या लग्नाच खर्च करावा लागू नये म्हणून सख्ख्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिची हत्या केली. आणि तिचा मृतदेह नाल्यात फेकला. मृत तरूणीला हे लोक नेहमीच त्रासही देत होते. 4 / 8मृत आरा शहरतील नवादा भागातील सर्वोदय नगर निवासी सोनू कुमार रायची १६ वर्षीय मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता झाली होती. तरूणीचा मृतदेह सापडल्यावर अजीमाबाद पोलिसांनी तिची ओळख न पटल्याने मृतदेह पोस्टमार्टमसाठी आरा येथे पाठवला होता. पण यादरम्यान घटनास्थळी काढलेली तरूणीचे काही फोटो तिच्या मामापर्यंत पोहोचले. ज्यानंतर तिची ओळख पटली.5 / 8मृतदेह पोस्टमार्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मृतकाचे मामा आणि नातेवाईक पोलिसांसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तरूणीचं नाव दिव्या असल्याचं समोर आलं आहे.6 / 8तरूणीच्या मामानुसार, दिव्या बेपत्ता असल्याची आणि तिची हत्या झाल्याच्या संशयाबाबत त्यांनी पोलिसात तरूणीच्या वडिलांविरोधात आणि सावत्र आई विरोधात तक्रार दिली होती. मामानुसार, मृत तरूणीला भाऊ-बहीण नव्हती. तिच्या आरोपी पित्याने १३ वर्षाआधी तिच्या आईचीही षडयंत्र करून हत्या केली होती.7 / 8इकडे पोलिसांनी मृत तरूणीच्या घरी छापेमारी करत तिच्या सावत्र आईला अटक केली. तर तरूणीचे वडील फरार आहेत. पोलीस तिच्या वडिलांचा शोध घेत आहेत. 8 / 8इकडे पोलिसांनी मृत तरूणीच्या घरी छापेमारी करत तिच्या सावत्र आईला अटक केली. तर तरूणीचे वडील फरार आहेत. पोलीस तिच्या वडिलांचा शोध घेत आहेत.