शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sidhu Moose Wala: थार थार थार...! एका मिनिटात ६०० गोळ्या झाडण्याची धमक; सिद्धू मूसेवालावर याच रायफलने हल्ला झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 11:43 AM

1 / 8
पंजाबी गायक सिद्धू मूसेवालावर रविवारी सायंकाळी घरापासून काही किमी अंतरावर भीषण हल्ला झाला. त्याच्या थार गाडीचा दोन कार पाठलाग करत होत्या. तिहार तुरुंगाच हत्येचा कट शिजला आणि सिद्धूला गाठून तीस गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळ्यांनी थारची तर चाळण केली, परंतू सिद्धू देखील वाचू शकला नाही.
2 / 8
काही सेकंदांचा खेळ होता, या वेळात एवढ्या गोळ्या झाडण्यासाठी कोणालाही एक ऑटोमॅटीक असॉल्ट रायफल लागेल. सिद्धूला मारण्यासाठी एके ४७ पेक्षाही अद्ययावत रायफल एएन-94 (AN-94) चा वापर करण्यात आला. एके ४७ पण रशियाचीच आणि एएन-94 पण त्यांचीच. एके ४७ च्या ऐवजी वापरण्यासाठी ही नवीन रायफल तयार करण्यात आली. परंतू तिचा वापर म्हणावा तसा होत नाही.
3 / 8
एएन-94 चे पूर्ण नाव एवतोमैत निकोनोव आहे. या रायफलची डिझायनिंग 1980 ला सुरु करण्यात आली होती. ती 1994 मध्ये पूर्ण झाली. ही रायफल गेनाडी निकोनोव यांनी बनविली होती. त्यांनीच निकोनोव मशीन गन बनविली होती. आता ही रायफल रशियन सैन्यात १९९७ पासून वापरात आहे.
4 / 8
या रायफलचे वजन 3.85 किलोग्राम आहे. यामध्ये 5.45x39 mm च्या गोळ्या वापरल्या जातात. या रायफलची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ही मायक्रोसेकंदामध्ये एका मागोमाग एक अशा दोन गोळ्या झाडते. म्हणजेच दुष्मनाला एकाच ठिकाणी दोन गोळ्या लागतात.
5 / 8
एएन-94 रायफलचा वेग एवढा आहे की बर्स्ट मोडमध्ये धडाधड 1800 गोळ्या झाडल्या जाऊ शकतात. फुल अॅटोमॅटीक मोडमध्ये दर मिनिटाला ६०० गोळ्या झाडण्याची धमक या रायफलमध्ये आहे. या गोळ्यांचा वेग ९०० मीटर प्रति सेकंद आहे. म्हणजेच एका सेकंदात ही गोळी जवळपास १ किमीचे अंतर तोडते.
6 / 8
एएन-94 ची फायरिंग रेंज 700 मीटर आहे. हे अंतर या रायफलमधून निघालेली गोळी एका सेकंदाच्या आत पार करते. या रायफलच्या एका मॅगझीनमध्ये ३० ते ४५ गोळ्या मावतात किंवा ६० राऊंडची कॅस्केट मॅगझीनही बसविता येते.
7 / 8
एवढीी खतरनाक असूनही अनेक देशांच्या सैन्यांनी ही रायफल नाकारली आहे. कारण तिचे डिझाईन आणि एके ४७ पेक्षा वापरण्यास कठीण. तसेच ती रिपेअर करण्यासही एवढी सोपी नाही. आणखी एक तोटा म्हणजे ती सर्वच ऋतूंमध्ये वापरता येत नाही.
8 / 8
रशियन सैन्य आणि एक देश वगळता सर्व देशांच्या सैन्यांनी ही बंदूक नाकारली आहे. परंतू हीच बंदूक जर दहशतवादी किंवा गँगस्टरांकडे आली तर पंजाबसारख्या घटना होऊ शकतात. कारण एखाद्यावर कमीत कमी वेळेत हल्ला करण्यासाठी ही बंदूक म्हणजे कर्दनकाळ आहे. दोन्ही मोड यासाठी कुप्रसिद्ध आहेत.
टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाPunjabपंजाबrussiaरशिया