By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 07:25 IST
1 / 7श्रद्धा हत्याकांडात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. छतरपूरच्या जंगलात पोलिसांना केसही सापडले होते. श्रद्धाचे वडील विकास यांच्या डीएनएशी ते जुळले आहेत. आफताबच्या छतरपूर फ्लॅटच्या किचनमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात सुकलेले रक्त सापडले होते. तेदेखील डीएनएशी जुळले आहे.2 / 7पॉलिग्राफ चाचणीदरम्यान आफताबला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासाशी जुळली आहेत. आरोपी पॉलिग्राफ चाचणीत खरे बोलला, असे तपास अधिकारी मानत आहेत. त्याने दिलेल्या बहुतेक प्रश्नांच्या उत्तरातील माहिती अचूक निघाली. जंगलात सापडलेल्या २३ हाडांपैकी ५ हाडे श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळत नाहीत. 3 / 7चाचणीदरम्यान सुमारे ३५ प्रश्न विचारण्यात आले. यापैकी बहुतांश प्रश्नांची अचूक उत्तरे आरोपीने दिली. आरोपीने चौकशीदरम्यान दिलेलीच उत्तरे पॉलिग्राफ चाचणीत दिली आहेत.4 / 7श्रद्धा कोण होती, तिची आरोपीशी मैत्री कशी होती, श्रद्धाचा खून का केला, कसा केला, मृतदेहाचे किती तुकडे केले, करवत आणि चाकू कुठे फेकले, किती मुलींशी मैत्री होती वगैरे प्रश्न त्याला विचारले गेले.5 / 7आफताब पूनावालाच्या जामीन अर्जावर आता गुरुवारी (दि. २२) सुनावणी होणार आहे. जामीन अर्ज शनिवारी सुनावणीसाठी आला होता.6 / 7तेव्हा आपण वकीलपत्रावर स्वाक्षरी केली आहे; परंतु जामीन अर्ज दाखल केला जाईल, याची कल्पना नव्हती, असे आफताबने शनिवारी दिल्ली न्यायालयात सांगितले.7 / 7आफताबने श्रद्धाचा खून नेमका का केला, त्याचा हत्येमागील हेतू काय हाेता. याचा उलगडा पाेलिसांना अद्याप झालेला नाही.