शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सत्यम घोटाळा ते 'आमच्याकडे दिवाळी गिफ्ट स्वीकारले जात नाही'; असाही एक बडा पोलीस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 10:24 IST

1 / 12
मुंबई : रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ही मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझेंनीच ठेवल्याचे एनआयए तपासात उघड झाले आहे. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंगांची उचलबांगडी ते त्यांनी केलेले वसुलीचे आरोप यामुळे मुंबई पोलीस कधी नव्हे एवढे बदनाम झाले आहेत.
2 / 12
परमबीर यांच्यावर देखील एका पोलिसाने करिअर उद्धवस्त केल्याचे आणि 50 लाख ते 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. अशातच एक पोलीस अधिकारी असे आहेत जे दिवाळी आली की त्यांच्या कार्यालयाबाहेर बोर्ड लावून दिवाळी गिफ्ट आणणाऱ्यांना दाराबाहेरूनच परतवून लावतात.
3 / 12
परमबीर यांच्यावर देखील एका पोलिसाने करिअर उद्धवस्त केल्याचे आणि 50 लाख ते 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. अशातच एक पोलीस अधिकारी असे होते जे दिवाळी आली की त्यांच्या कार्यालयाबाहेर बोर्ड लावून दिवाळी गिफ्ट आणणाऱ्यांना दाराबाहेरूनच परतवून लावायचे.
4 / 12
परमबीर सिंगांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सचिन वाझेंकडून गृहमंत्री अनिल देशमुख दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करायला सांगायचे असा आरोप केला होता. ही अशी गोष्ट होती जी तेव्हा ऑफलाईन होती परंतू परमबीर यांची बदली झाल्याने ती चव्हाट्यावर आली.
5 / 12
याचे पडसाद राज्यातच नव्हे तर आता लोकसभेतही उमटले आहेत. यामुळे मुंबई पोलिसांची पुरती बदनामी झाली आहे. पोलीस आयुक्तांनीच आणखी एक पोलीस अधिकारी एसीपी संजय पाटील यांच्याशी झालेले चॅटिंग जाहीर करत याला वाच्यता फोडली. मात्र, या पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहेत, जे एक मिसाल बनले आहेत.
6 / 12
व्ही व्ही लक्ष्मी नारायण यांचे नाव ऐकले असेल. हो, तेच अधिकारी ज्यांनी हजारो कोटींचा सत्यम घोटाळा उघडकीस आणला. तेव्हा ते सीबीआयमध्ये होते. नंतर ते महाराष्ट्र केडरमध्ये परत आले. त्यांच्या कारकीर्दीमध्ये एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे.
7 / 12
आपल्याकडे दिवाळी गिफ्ट नावाचा एक प्रकार आहे. खासगी कंपन्यांचे अधिकारी ते सरकारी अधिकारी साऱ्यांनाच त्यांच्याशी रोज ज्यांचे संबंध येतात असे लोक दिवाळी आली की महागडी गिफ्ट हमखास पाठवतात.
8 / 12
ही एक प्रकारची त्यांची मर्जी रहावी म्हणून लाचच असते. तर व्ही व्ही लक्ष्मीनारायण दिवाळी आली की त्यांच्या कार्यालयाबाहेर एक बोर्ड लावायचे, असे सांगितले जाते.
9 / 12
''आमच्याकडे दिवाळी गिफ्ट स्वीकारले जात नाही'', असा तो बोर्ड होता. लक्ष्मी नारायण यांनी काही वर्षांपूर्वी व्हीआरआएस घेतली.
10 / 12
नावा प्रमाणे समाजाची सेवा असे आहे, परंतू तीचा मूळ उद्देश हा मुंबईतील डान्स बार, रेस्टॉरंट, हॉटेलवर छापे टाकून अवैध धंदे आणि त्यामध्ये अडकलेल्यांना सोडविणे हे आहे. ही मुंबई पोलिसांचीच एक शाखा आहे.
11 / 12
मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाराखाली ही शाखा येते. काही वर्षांपूर्वी ही शाखा क्राईम ब्रांचपासून वेगळी करण्यात आली होती. व थेट पोलीस आयुक्तालयाला जोडली होती.
12 / 12
जेव्हा डॉ. सत्यपाल सिंह मुंबई पोलिस आयुक्त झाले तेव्हा त्यांनी पुन्हा ती शाखा मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपविली. परमबीर सिंगांनी याच शाखेचा 100 कोटींच्या वसुलीशी संबंध जोडत आरोप केला आहे.
टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझे