शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सासरच्या मंडळींना अश्लील क्लिप पाठवून मोडले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 15:21 IST

1 / 7
मध्य प्रदेशातील रीवा येथील एका तरूणीवर नोकरी आणि एका पार्टीच्या महिला मोर्च्याच्या अध्यक्षा बनविण्याचे देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
2 / 7
आरोपीने या तरुणाली एक भाड्याचे घर मिळवून दिले होते. या घरात तिची अश्लील क्लिप बनविली आणि तिला ब्लॅकमेल करून तिल्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली.
3 / 7
इतकेच नाही तर या तरुणीचा लग्न ठरल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींना अश्लील क्लिप पाठविल्या. २० वर्षीय तरुणीचे काही महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते.
4 / 7
ही तरूणी मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी आरोपी मोहम्मद अकबर याच्या संपर्कात आली होती.
5 / 7
या आरोपीने तिला नोकरी देण्याचे आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा बनविण्याचे आमिष दाखविले. तसेच, त्याने भाड्याने तिला घर मिळवून दिले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.
6 / 7
इतकेच नाही तर आरोपीने महिलेचे लग्न मोडण्यासाठी अश्लील व्हिडिओ सासरच्या मंडळींना पाठवले, ज्यामुळे तिचे लग्न मोडले. यानंतर अखेर या तुरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
7 / 7
पोलिसांनी आरोपी मोहम्मद अकबर याचा मोबाईल ताब्यात घेतला असून त्याची सायबर सेलकडून चौकशी करण्यात येत आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश