दोन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यावर राज कुंद्राची झाली अशी अवस्था, फोटो बघून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 14:36 IST
1 / 6पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी बेड्या ठोकलेला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आता या प्रकरणात होत असलेल्या चौकशीमधून नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. 2 / 6न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केलेल्या राज कुंद्रा याची आज पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी करण्यात आली. 3 / 6वैद्यकीय चाचणी केल्यानंतर राज कुंद्रा याची रुग्णालयाबाहेरची छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये राज कुंद्रा याची दोन दिवस पोलीस कोठडीत वास्तव्य केल्यानंतर झालेली अवस्था दिसत आहे. 4 / 6राज कुंद्रा याला पोलीस आपल्या व्हॅनमध्ये बसवून नेताना दिसत आहेत. त्यावेळी टिपण्यात आलेल्या या छायाचित्रांमध्ये राज कुंद्राचा चेहरा पडलेला दिसत आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत आहे. 5 / 6या खटल्यामध्ये राज कुंद्रासह ११ अजून लोकांना अटक करण्यात आली आहे. आता उद्या राज कुंद्रा याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. 6 / 6मिळत असलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा हाच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगितले. तसेच त्याचे फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स सिल करण्यात आले आहेत.