पोलिसही हादरले! प्रेयसीसोबत लग्न करायचे होते, गँग बनवून प्रियकर बनला लुटारू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 13:52 IST
1 / 10युद्धात आणि प्रेमात सारे काही माफ असते. हे वाचायला किंवा सिनेमात चांगले वाटते. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये पोलिसांनी एका टोळक्याला पकडले आहे. 2 / 10प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पैशांची गरज होती म्हणून मुख्य आरोपी असलेल्या प्रियकराने चुकीचा रस्ता निवडला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 3 / 10तेथील एका मेडिकल दुकानात चोरी झाल्यामुळे पोलिसांनी केलेल्या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना पकडण्यात आले आहे. 4 / 10मुख्य आरोपी त्याच्या प्रेयसीसोबत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. 10 फेब्रुवारीला त्यांनी हे मेडिकल फोडले होते. एका पुलावर चार जणांनी मेडिकलच्या मालकाला घेरले. 5 / 10दांड्याने त्याला मारहाण करण्यात आली, त्याच्याकडून बाईक, मोबाईल आणि रुपये लुटण्यात आले. दुकानदार बेशुद्ध झाला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. 6 / 10या प्रकरणात पोलिसांना सुरुवातीला मोठे यश मिळाले. या टोळीच्या तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना एक लव्ह स्टोरी असल्याचे समजले. 7 / 10मिर्झापूरला राहणारा दिनेश हा त्यांचा मुखिया होता. त्याने प्रेयसीबरोबर पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन बनविला होता. यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्याला झटपट पैसे हवे होते. 8 / 10यासाठी त्याने गुन्हेगारीचा रस्ता पकडला. यानंतर त्याने लुटलेली बाईक विकून ते पैसे घेऊन पसार झाला आहे. 9 / 10पोलिसांनी सांगितले की, जे आरोपी पकडण्यात आले आहेत त्यांची आधी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीय. महत्वाचे म्हणजे जेव्हा जेव्हा पोलीस तपासासाठी त्या ठिकाणी जात होते, तेव्हा हे तिघे आरोपी तिथे पोहोचत होते.10 / 10आणि पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवायचे. सारखे सारखे असेच घडल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय आला आणि त्यांना ताब्यात घेतले.