शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोलिसांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून कुलदीप फज्जा झाला होता फरार, ७२ तासात एन्काउंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 19:36 IST

1 / 6
दिल्ली पोलिसांनी ७२ तासात एन्काउंटर करून फज्जाला ठार मारले. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाच्या हाती हे एक मोठे यश आहे. दिल्ली येथील रोहिणी येथे विशेष पथकाने कुलदीप फज्जा आणि त्याच्या साथीदारांना घेरले.  (All Photo - Aaj Tak)
2 / 6
वास्तविक, कुलदीप फज्जा गेल्या दोन दिवसांपासून रोहिणी सेक्टर -14 मधील तुळशी अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर डी -9 मध्ये लपला होता. त्याला मदत करणारे त्याचे दोन साथीदार योगेंद्र आणि भूपेंद्र देखील होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमने या दोघांना घटनास्थळावरून अटक केली.
3 / 6
जेव्हा पोलिस पथकाने फज्जाला रोखले तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला, त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पोलिसांनी फज्जाला गोळ्या घालून ठार केले. चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंकडून अनेक बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या. यादरम्यान, दिल्ली पोलीस स्पेशलचे अधिकारीही सुदैवाने वाचले. बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या.
4 / 6
दिल्ली पोलिसांशी चकमकीत जखमी झालेल्या फज्जाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तत्पूर्वी, कुलदीप फज्जा पोलिसांना चकवा देऊन फिल्मी स्टाईलने हॉस्पिटलमधून पळून गेला. हे सर्व 25 मार्च रोजी घडले जेव्हा दिल्ली पोलिसांच्या तिसर्‍या बटालियनने कुलदीप फज्जाला जीटीबी रुग्णालयात आणले होते.
5 / 6
त्याचवेळी स्कॉर्पिओत असलेल्या ५ नराधमांनी पोलिसांवर मिरची पावडर फेकली होती आणि कुलदीप फज्जा पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. त्या वेळीही पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये एक गुंड जागीच ठार झाला, पण कुख्यात गुंड कुलदीप फज्जा बचावला आणि दिल्ली पोलिसांची झोपच उडाली. 
6 / 6
कुलदीप फज्जा हा गोगी टोळीचा कुख्यात सदस्य होता, त्यावर 70 हून अधिक गुन्हे दाखल झाले होते. तो दिल्ली आणि हरियाणामध्ये वॉन्टेड आरोपी होता. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर 2 लाखांचे बक्षीस ठेवले होते. 2020 मध्ये त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. तो फरार झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सर्व पथकांना सतर्क केले गेले.
टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसdelhiदिल्ली