1 / 11मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यात एका तरूणाने आपल्या वडिलांची आणि पत्नी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 / 11रिपोर्ट्सनुसार, आपल्या वडिलांना आणि पत्नीला त्याने आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. त्यानंतर संतापलेल्या ३५ वर्षीय तरूणाने दोघांची कुऱ्हाडीने हत्या केली.3 / 11दोघांचीही हत्या केल्यानंतर तरूणाने याची माहिती आपल्या काकांना स्वत: घरी जाऊन दिली. त्यानंतर कुऱ्हाड घेऊन आपल्या घराच्या दरवाज्यात बसून राहिला. पोलिसांनी आरोपीला त्याच्या घराच्या उंबरठ्यावरून अटक केली.4 / 11अतिरिक्त पोलीस अधिक्षक एस.एस. बघेल यांनी शनिवारी सांगितलं की, ही घटना गोकलाहार गावातील आहे. 5 / 11शुक्रवारी रात्री संतोष लोधीने आपले वडील अमन लोधी(६५) आणि पत्नी कविता(३२)ची कुऱ्हाडीने तुकडे करत हत्या केली. 6 / 11पोलीस अधिकारी म्हणाले की, चौकशी दरम्यान संतोषने पोलिसांना सांगितलं की, घरात वडील आणि पत्नीला त्याने शारीरिक संबंध ठेवताना पाहिलं होतं. 7 / 11हा सगळा प्रकार पाहिल्यावर तो चांगलाच संतापला होता. तो रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याने दोघांचीही हत्या केली.8 / 11एस.एस.बघेल म्हणाले की, आरोपीच्या एका नातेवाईकाने पोलिसांना या घटनेची सूचना दिली. 9 / 11पोलिसांनी एका रूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात दोन मृतदेह आढळून आले. तर आरोपी घराच्या उंबरठ्यावर बसला होता.10 / 11ते म्हणाले की, दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तर आरोपीला अटक करून प्रकरणाची चौकशी केली जात आहे. 11 / 11आरोपी संतोष लोधी आणि कविता यांचं १५ वर्षाआधी लग्न झालं होतं. त्यांना एक १४ वर्षांचा मुलगा आणि १२ वर्षांची मुलगीही आहे. संतोषला अटक झाल्यावर त्याचे काका अर्जुन लोधी मुलांना सोबत आपल्या घरी घेऊन गेले.