स्पा सेंटरमध्ये आठ जणांची हत्या करणारा 'तो' आरोपी सेक्स अॅडिक्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 14:25 IST
1 / 8अमेरिकेतील तीन स्पा सेंटरमध्ये (मसाज पार्लर) अंदाधुंद गोळीबार करून चार महिलांसह 8 जणांची हत्या करणाऱ्या आरोपीबाबत आता नवी माहिती उघडकीस आली आहे. 2 / 8 21 वर्षीय आरोपी रॉबर्ट ऐरन लॉन्ग हा सेक्स अॅडिक्ट आहे. त्यामुळेच त्याने हा हल्ला केला, असे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, जातीय भावनेतून हा हल्ला केला नाही असे आरोपी रॉबर्ट ऐरन लॉन्गने पोलिसांना सांगितले. 3 / 8आरोपीने असा दावा केला की, तो सेक्स अॅडिक्ट आहे. यामुळे तो याकडे आकर्षणाचे स्रोत म्हणून याकडे पहात होता. त्यामुळे त्याला तेथून बाहेर काढण्यात आले होते.4 / 8एका अधिकाऱ्यांने सांगितले की, त्यांना असे काही संकेत मिळाले आहेत. त्यानुसार, आरोपीने असा व्यवसाय करण्याऱ्या आस्थापनांना भेट दिली असावी. तसेच, तो पोर्न इंडस्ट्रीवर हल्ला करण्यासाठी फ्लोरिडाला जाण्याचा विचार करीत होता, असेही अधिका-यांनी म्हटले आहे. 5 / 8चेरोकी काउंटी शेरीफचे प्रवक्ते कॅप्टन जय बेकर म्हणाले, 'आरोपीकडे स्पष्टपणे असा मुद्दा आहे, ज्यामुळे तो सेक्स अॅडिक्टकडे आकर्षित होता. आरोपीला अशा काही ठिकाणी (मसाज पार्लर) पाहिले गेले आहे, जिथे त्याला जाण्याची परवानगी आहे आणि त्याठिकाणी त्याच्या गरजा भागविल्या जाऊ शकतात.'6 / 8दरम्यान, काल अमेरिकेच्या अटलांटामध्ये तीन वेगवेगळ्या मसाज पार्लरवर झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती जखमी आहे. यामध्ये ज्या दोन स्पामध्ये गोळीबार झाला ते एकमेकांसमोर आहेत तर तिसरा स्पा हा चेरोकी काऊंटीमध्ये आहे. 7 / 8या गोळीबारात मृत्यू झालेल्या 8 जणांमध्ये चार महिलांचा समावेश असून त्या आशियाई असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जातीय भावनेतून ही हत्या केल्याचा संशय आधी वर्तविण्यात येत होता.8 / 8असोसिएटेड प्रेस, यूएसए टुडे आणि नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीने एकत्रित केलेल्या डेटाबेसनुसार, 2021 मध्ये अमेरिकेतील हा सहावा हल्ला आहे. ज्यामध्ये सामान्यांची हत्या करण्यात आली होती. तर ऑगस्ट 2019 मध्ये नऊ जणांची हत्या करण्यात आली होती.