शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२ रुपये रोजंदारी करणाऱ्यानं दाऊदला दाखवला होता साक्षात मृत्यू; भररस्त्यात गाठलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 6:11 PM

1 / 10
द मॉस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, ज्यानं मुंबईत १९९३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून शेकडो निष्पाप लोकांचे बळी घेतले होते. अनेक दशकांपासून भारत सरकार या अंडरवर्ल्ड डॉनला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु अद्याप याला यश आले नाही.
2 / 10
आजही दाऊदच्या नावाची दहशत अंडरवर्ल्डमध्ये कायम आहे. दाऊदला टक्कर देण्याची हिंमत कुणीही करत नाही. गुन्हेगारी क्षेत्रात कुख्यात असलेल्या दाऊदला ३ दशकापूर्वी मुंबईत भररस्त्यात घेरण्यात आले होते. त्याच्यावर चहुबाजूने गोळीबारी सुरू झाली होती.
3 / 10
या हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या दाऊद इब्राहिमला तहान लागली होती. शूटरद्वारे दाऊदवर गोळीबारी केल्याच्या घटनेनंतर डॉनची झोप उडाली होती. ३० वर्षापूर्वी या हल्ल्यात ज्या व्यक्तीने दाऊदला ठार करण्याचा प्रयत्न केला. त्याला मारता आले नाही मात्र दाऊदला मृत्यू अगदी जवळून पाहता आला.
4 / 10
अब्दुल लतीफ(Abdul Latif).. १९८० आणि ९० च्या दशकात ज्याची बंदुक बोलत होती. जुगार, अवैध दारु तस्करी, अपहरण आणि खंडणी, खून या पोलीस ठाण्यातील प्रत्येक नोंदवलेल्या गुन्ह्यात एक नाव कायम होते ते म्हणजे अब्दुल लतीफ
5 / 10
गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, कराची असो वा दुबई प्रत्येक ठिकाणी अब्दुल लतीफचा दबदबा कायम होता. दहशत आणि धमक दोन्ही अब्दुल लतीफच्या नावावर होती. मात्र पोलिसांच्या चकमकीत अब्दुल लतीफ जीवे मारला.
6 / 10
याच अब्दुल लतीफनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं भररस्त्यात गोळीबार केला होता. लतीफच्या जीवनावर अनेक सिनेमे बनवून बॉलिवूडमधील निर्मात्यांनी त्याच्या मृत्यूनंतर कोट्यवधीची कमाई केली. आजही गुन्हेगारीच्या इतिहासात अब्दुल लतीफचं नाव आहे.
7 / 10
२४ ऑक्टोबर १९५१ मध्ये गुजरातच्या अहमदाबाद इथे राहणाऱ्या अब्दुल वाहब शेख यांच्या घरी अब्दुल लतीफचा जन्म झाला. सकाळपासून रात्रीपर्यंत जीवापाड मेहनत करून वडील ७ मुलांसह कुटुंबाचे पालनपोषण करायचे. त्यावेळी अब्दुल लतीफ २ रुपये रोजंदारीवर काम करत होता.
8 / 10
पैशाच्या त्रासातून घरात रोज भांडणं व्हायची मग लहान वयातच दारुच्या व्यवसायापासून जुगारापर्यंत लतीफनं काम सुरू केले. २-३ वर्ष ते कृत्य केल्यानंतर खून, खंडणीच्या क्षेत्रात लतीफन पाय ठेवला. पैसे घेऊन हत्या करणं त्याचे रोजचं काम झाले.
9 / 10
१९८१ मध्ये मुंबईत सोने तस्करीच्या वादातून दाऊद इब्राहिमचा मोठा भाऊ साबिर इब्राहिमची पठाण गँगनं हत्या केली. या पठाण गँगला लपण्यासाठी अब्दुल लतीफनं अहमदाबादमध्ये जागा दिली होती. त्यामुळे अब्दुल लतीफ पठाण गँगचा खास बनला.
10 / 10
दाऊद इब्राहिम अहमदाबादच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये कैद होता. एकेदिवशी जेलमधून त्याला कोर्टात हजर करणार होते. तेव्हा अब्दुल लतीफच्या सांगण्यावरून शूटरनं दाऊदवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात दाऊद वाचला. परंतु या हल्ल्याने दाऊद प्रचंड भयभीत झाला.
टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिम