1 / 8एका प्रसिद्ध गायकाचा विचित्र अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे मृत २३ वर्षीय गायक एमसी केविन याचा केवळ दोन आठवड्यांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या दोन आठवड्यानंतरच तो पत्नीची फसवणूक करून एका मॉडेलसोबत शरीरसंबंध ठेवत होता. हे संबंध ठेवत असतानाच घडलेल्या एका विचित्र दुर्घटनेत या गायकाला त्याचे प्राण गमवावे लागले. 2 / 8ब्राझीलमधील प्रसिद्ध गायक एमसी केविन ब्राझीलमधील रियो दी जानिरो येथील एका हॉटेलमध्ये मित्र व्हिक्टर याच्यासोबत वास्तव्यास होता. तिथे त्याची ओळख २६ वर्षीय मॉडेल बियान्का हिच्याशी झाली. तिथे या सर्वांनी मिळून अमली पदार्थांचे सेवन केले. त्यानंतर व्हिक्टरने बियान्कासोबत संबंध प्रस्थापित करण्याच्या ऑफरबाबत बोलणी केली. 3 / 8मात्र केविनने स्पष्टपणे सांगितले की, त्याने ३३ वर्षीय डियोलेन हिच्यासोबत विवाह केला आहे. त्यामुळे या मॉडेलने या संबंधांबाबतची माहिती गुप्त ठेवली पाहिजे. त्याला या मॉडेलने सुरुवातीला नकार दिला. मात्र काही वेळानंतर तिने दोघांचेही म्हणणे ऐकले. बियान्काने सांगितले की, व्हिक्टर आणि केविनला त्यासाठी प्रत्येकी ३९० डॉलर द्यावे लागतील. 4 / 8ही डील फायनल झाल्यानंतर याच हॉटेलमध्ये राहत असलेला क्रूझ नावाचा इसम केविनजवळ आला. जेव्हा त्याला या ऑफरबाबत समजले तेव्हा त्यानेसुद्धा यामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र जेव्हा व्हिक्टर आणि केविनने त्याला तिथून हाकलले तेव्हा त्याने केविनच्या सिक्युरिटी गार्डला जाऊन सांगितले की, केविनची पत्नी त्याला शोधत आहे. 5 / 8क्रिमिनल लॉयर असलेली केविनची पत्नी डियओलेन हिसुद्धा याच हॉटेलमध्ये थांबली होती. मात्र केविनला त्याबाबत माहिती नव्हते. मात्र ही बाब क्रुझला ठावूक होती. त्यानंतर केविनच्या सिक्युरिटी गार्डने व्हिक्टरला मेसेज करून सांगितले की, केविनची पत्नी त्याला शोधत आहे. मग व्हिक्टने केविनला याबाबत सांगितले. मात्र केविनने त्याकडे दुर्लक्ष केले. 6 / 8 मात्र काही वेळानंतर जेव्हा व्हिक्टर वॉशरूममधून बाहेर येत होता तेव्हा त्याने पाहिले की, केविनची पत्नी त्यांच्या खोलीपर्यंतप पोहोचलेली आहे. तसेच केविन बाल्कनीमध्ये लटकून स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या गडबडीत केविनचा पाय घसरला आणि तो पाचव्या मजल्यावरून खाली पडला. 7 / 8त्यानंतर केविनला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ब्राझीलचा हा गायक खूप लोकप्रिय होता. त्याच्या मृत्यूनंतर सुपरस्टार नेयमारनेसुद्धा त्याला श्रद्धांजली वाहिली. केविनचे इन्स्टाग्रामवर १० दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स होते. तसेच तो सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह होता. 8 / 8दरम्यान, या घटनेनंतर बियान्का वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्यावर सोशल मीडियामधून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहेत. आता बियान्काने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, या प्रकरणात लोक मला दोषी ठरवत आहेत. मात्र त्यांनी हे समजले पाहिजे की मी त्यांच्याकडे गेले नव्हते तर केविन माझ्याकडे आला होता. या घटनेनंतर मलाही इतर कुठल्याही सर्वसामान्य माणसाप्रमाणे धक्का बसला आहे.